आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिर्डीच्या साई मंदिरात जाण्यास मूकबधिर विद्यार्थ्यांना रोखले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी- साईबाबापाऊस पडू दे, दुष्काळ हटू दे अशी प्रार्थना करण्यासाठी साईमंदिरात जाणाऱ्या साकुरी येथील साई सेवा मतिमंद शाळेच्या ७५ मूकबधिर, मतिमंद विद्यार्थ्यांना संस्थान प्रशासनाने रोखले. अखेर द्वारकामाईलगत उभे राहून या विद्यार्थी शिक्षकांनी प्रार्थना केली.प्रशासनाच्या या कृतीमुळे साईभक्तांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

व्हीआयपी धनिकांसाठी पायघड्या घालणाऱ्या संस्थानने साईबाबांना साकडे घालायला गेलेल्या मतिमंद विद्यार्थ्यांना मंदिरात रोखले. मुखदर्शनही नाकारले. मात्र, नंतर परवानगी देत द्वारकामाईलगतच्या सभामंडपात प्रार्थना करू दिली.

समाधीसमोरील मोकळ्या जागेत प्रार्थना करू द्या, अशी विनंती शिक्षकांनी केली, पण ती फेटाळण्यात आली. "संसार' कविता म्हणत विद्यार्थ्यांनी साईचरणी प्रार्थना केली.साईबाबांचे दर्शन घेताच या विद्यार्थ्यांनी परतीचा रस्ता धरला. काही साईभक्तांनी हा प्रकार जिल्हाधिकारी अिनल कवडे यांच्या कानावर घातला. त्यांनी या विद्यार्थ्यांना दर्शन घेऊ देण्याचे आदेश संस्थान प्रशासनाला दिले, परंतु तोपर्यंत हे विद्यार्थी गेले होते. या विद्यार्थ्यांनी महालक्ष्मी मंदिर ते द्वारकामाई मंदिरापर्यंत साईबाबा पाऊस पडू दे अशा घोषणा दिल्या.गर्दी नसताना या विद्यार्थ्यांना रोखल्याबाबत मुख्याध्यापिका सुनंदा घुले, हेमलता पवार, स्वाती शेळके, रोहित शेळके, नासीर देशमुख, मंगेश वाकचौरे, दीपक कोकणे आदींनी संस्थानच्या या कृतीचा निषेध केला.
द्वारकामाई लगतच्या सभामंडपात प्रार्थना करताना साकुरी येथील साई सेवा मतिमंद शाळेचे विद्यार्थी.