आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर खासदारांच्या घरासमोर भजन करू, विडी कामगारांचा बैठकीत निर्णय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विडी कारखानदार सरकारमधील वादावर तोडगा काढून विडी कामगारांचा प्रश्न शुक्रवारपर्यंत (२२ एप्रिल) सोडवा, अन्यथा खासदार दिलीप गांधी यांच्या घरासमोर शुक्रवारी रात्रभर भजन करण्याचा निर्धार विडी कामगारांनी केला. रविवारी पालकमंत्री राम शिंदे यांच्या सावेडीतील संपर्क कार्यालयासमोर विडी कामगार संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विडी बंडलांवर ८५ टक्के धोका चित्र छापणे अशक्य असल्याचे कारण पुढे करत विडी कारखानदारांनी बंद पुकारला आहे. आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी राज्य विडी कामगार फेडरेशन, लालबावटा विडी कामगार युनियन नगर विडी कामगार संघटनेतर्फे रविवारी पालकमंत्री शिंदे यांच्या संपर्क कार्यालयासमोर बैठक घेण्यात आली. विडी कामगारांचे नेते शंकर न्यालपेल्ली, नगरसेवक मनोज दुलम, धनंजय जाधव, निखील वारे, श्रीपाद छिंदम, अॅड. सुधीर टोकेकर, सुभाष लांडे, बापू कानवडे, शंकरराव मंगलारप आदी उपस्थित होते. बैठकीत कारखाने सुरू झाल्यास शुक्रवारी सायंकाळी वाजता खासदार गांधींच्या निवासस्थानासमोर रात्रभर भजन करून धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.