आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिक्की प्रकरण: दोन अहवालांचे विराेधी निष्कर्ष

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अंगणवाडीत पुरवठा करण्यात आलेली सूर्यकांता राजगिरा चिक्की खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल पुणे येथील प्रयोगशाळेने दिला आहे. तर नाशिकच्या प्रयोगशाळेने मात्र चिक्की खाण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा मंजूषा गुंड यांनी शुक्रवारी दिली.

चिक्की मातीमिश्रित असल्याची तक्रार पंचायत समितीचे सभापती संदेश कार्ले यांनी केली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेने दोन सरकारी व दोन खासगी प्रयोगशाळांत चिक्की तपासणीसाठी पाठवली होती. अन्न आणि आैषध प्रशासनानेही चिक्कीचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्यानुसार महिनाभरापूर्वी दोन सरकारी प्रयोगशाळांनी चिक्की खाण्यास योग्य असल्याचा अहवाल दिला होता. पण अन्न आणि आैषध प्रशासनाच्या अहवालात चिक्की अयोग्य असल्याचे म्हटले होते. तसेच चिक्की पुरवठादाराला नोटीसही बजावली आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेने पाठवलेल्या दोन खासगी प्रयोगशाळांचा परस्परविरोधी अहवाल जिल्हा परिषदेला प्राप्त झाला.