आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूचोरी रोखण्यासाठी दक्षता समिती स्थापणार, लोकप्रतिनिधींचा होणार समितीत समावेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अनधिकृत वाळूउपसा करून सरकारचा कोट्यवधींचा महसूल बुडवणाऱ्यांना चाप बसावा यासाठी जिल्हानिहाय दक्षता पथके स्थापन करण्याचा निर्णय शासनाने घेतला अाहे. यापूर्वी वाळूउपसा रोखण्यासाठी महसूल, पोलिस प्रादेशिक परिवहन विभागाची पथके कार्यरत असतानाच आता या नव्या समितीची त्यात भर पडली आहे. या समितीत प्रथमच लोकप्रतिनिधींचा समावेश करण्यात येणार आहे.

नगर िजल्ह्यातील संगमनेर, नेवासे, पारनेर, श्रीगोंदे, अकोले, कर्जत, जामखेड, श्रीरामपूर, राहुरी या तालुक्यांमधील मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा सीना या नदीपात्रांमध्ये प्रशासनाचे अधिकृत एकूण १७९ वाळूसाठे आहेत. या अधिकृत वाळूसाठ्यातून प्रशासनाला कोट्यवधींचा महसूल मिळतो. १७९ वाळूसाठ्यांपैकी केवळ २५ वाळूसाठ्यांचे अॉनलाइन लिलाव झाले अाहेत. अजूनही १५३ साठ्यांचे लिलाव झालेले नाहीत. सर्व वाळूसाठ्यांचे लिलाव झाल्याने जिल्ह्यात चोरट्या मार्गाने वाळूउपसा सुरूच आहे.

अधिकृत गौण खनिजे वाळूउपसा रोखण्यासाठी महसूल, पोलिस प्रादेशिक परिवहन विभागाची पथके आहेत. ही पथके प्रशासनाची असली, तरी पथकामध्ये नेहमीच समन्वयाचा अभाव असतो. महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाईची माहिती पोलिसांकडे नसते, तर पोलिसांनी परिवहन विभागाने केलेल्या कारवाईची माहिती महसूल विभागाला नसते. अवैध वाळूउपसा वाहतुकीतून प्रचंड पैसा मिळत असल्यामुळे जिल्ह्यात हा गोरखधंदा जोमाने सुरू आहे. नगर जिल्ह्यातील नदीपात्रातून अवैधरित्या वाळूउपसा करून ती वाळू बीड, आैरंगाबाद, तसेच पुणे जिल्ह्यात विक्रीसाठी पाठवली जाते.

या अवैध वाळूउपशाला चाप बसवा, यासाठी शासनस्तरावर विविध उपाययोजना सुरू अाहेत. तथापि, अवैध उपसा रोखण्यात प्रशासनाला यश आलेले नाही. यापूर्वी वाळूउपसा करताना आढळणाऱ्या व्यक्तींविरुध्द सहा महिन्यांची जिल्हाबंदी घातली जात होती. त्यात शासनाने बदल करून ती सहा महिन्यांऐवजी एक वर्ष करण्याचा िनर्णय घेण्यात आला आहे.आता राज्य सरकारने अवैध वाळूउपसा रोखण्यासाठी जिल्ह्यात दक्षता समिती स्थापन करण्याचा िनर्णय घेतला आहे. जिल्हा तालुका स्तरावर ही दक्षता समिती असणार आहे. या समितीत महसूल, पोलिस, प्रादेशिक परिवहन स्थानिक लोकप्रतिनिधींचा समावेश असेल.
कारवाई थंडावली
चारमहिन्यांपूर्वी मुळा, प्रवरा, गोदावरी, भीमा सीना या नद्यांमध्ये अनधिकृतपणे वाळूउपसा करणाऱ्यांविरुध्द महसूल पोलिस प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई सुरू केली. अनधिकृतपणे वाळूउपसा करणारी वाहने पकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र, मागील अनेक दिवसांपासून ही कारवाई थंडावली आहे.
वाळूचोरी रोखण्यासाठी महसूलची १५ पथके तैनात
प्रत्येकतालुक्यात अवैध वाळूउपसा वाळू वाहतूक रोखण्यासाठी प्रांताधिकारी तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली १५ पथके स्थापन करण्यात अाली आहेत. ही पथके सध्या कार्यरत आहेत. दक्षता समिती स्थापन करण्याबाबत शासनस्तरावरुन अजून काही माहिती आलेली नाही. शासनाचे आदेश आल्यानंतर तातडीने ही समिती स्थापन केली जाईल.'' आर.एच. ब्राह्मणे, गौण खनिज कर्म अधिकारी, अहमदनगर.