आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वनखात्यात नोकरीचे आमिष दाखवून तीन लाखांना गंडवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पुणे जिल्ह्यात वनखात्यात गार्डची नोकरी देण्याचे आमिष दाखवून दोघांनी तीन लाखांची फसवणूक केल्याचा गुन्हा एमआयडीसी पोलिसांनी दाखल केला. हा प्रकार २० जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान घडला. महिलेसह दोघांविरुद्ध पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला.
बाबासाहेब नारायण रेडे (मुंजोबा चौक, नागापूर) यांनी फिर्याद दिली आहे. आनंदीबाई नवनाथ भोंडवे दौंड नामदेव मारुती मोरे (मोरेवस्ती, दौंड, जि. पुणे) यांनी बाबासाहेब रेडे यांच्या भावाला वनखात्यात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून तीन लाख रुपये घेतले. पैसे देऊनही नोकरी मिळाल्यामुळे फसवणूक झाल्याचे रेडे यांच्या लक्षात आले.

नंतर शोधाशोध करुनही दोघे सापडले नाही, म्हणून रेडे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली. हा प्रकार नागापूर गावात रेडे यांच्या राहत्या घरात घडला. भोंडवे माेरे यांनी रेडे यांचा विश्वास संपादन करण्यासाठी बनावट दस्ताऐवज तयार करुन दिले होते. त्यामुळे एमआयडीसी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास एमआयडीसीचे पोलिस हेड कॉन्स्टेबल शेजवळ करत आहेत.