आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रतनवाडीत अकरा, तर घाटघरला 8 इंच पाऊस, सोमवारी पावसाचा जोर ओसरला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील रतनवाडी येथे सोमवारी सकाळपर्यंत २४ तासांत ११ इंच (२६९ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली. घाटघर परिसरातही इंच (२०६ मिलिमीटर) पांजरे येथे सात इंच (१७७ मिलिमीटर) पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊन तो हजार ७७६ दशलक्ष घनफुटांपर्यंत पोहोचला आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही जोरदार पावसामुळे नदीचे पाणी वेगाने धरणात जमा होत आहे. सोमवारी मुळा धरणाचा पाणीसाठा ५५३५ दशलक्ष घनफुटांवर पोहोचला आहे. दोन्ही धरणांत येणाऱ्या पाण्यामुळे शेतकरी सुखावला आहे. मात्र, सोमवारी पावसाचा जोर कमी झाला आहे.
मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळपर्यंत जोर कायम होता. त्यामुळे दोन्ही धरणांत पाण्याची आवक सुरू आहे. सध्या भंडारदरा धरणातून अडीच दिवसांचे विशेष आवर्तन सुरू आहे. निळवंडे धरणातही सोमवारी सकाळपर्यंत ४६९ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. कृष्णावंती नदीवरील ११५ दशलक्ष घनफूट क्षमतेचा वाकी जलाशयही भरण्याच्या मार्गावर आहे. त्यात सोमवारी सकाळपर्यंत ७५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला होता. वाकी जलाशय पूर्ण भरल्यावर त्याचे पाणी निळवंडे धरणात जाण्यास सुरुवात होणार आहे. दरम्यान, पाऊस अनुभवण्यासाठी, धबधबे पाहण्यासाठी या भागात पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. काही पर्यटक सोमवारीही या परिसरात होते.

गेल्या ३६ तासांत रतनवाडी परिसरात सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला. रतनवाडीबरोबरच घाटघर, साम्रद, शिंगणवाडीे, उडदावणे परिसरातही चांगला पाऊस झाला. जोरदार पावसामुळे परिसरातील ओढे-नाले वाहते झाले आहेत. फक्त भंडारदरा परिसरात पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी अधूनमधून सरी कोसळतच होत्या. सोमवारी सायंकाळी निळवंडे धरणासाठी सुरू असलेले आवर्तन बंद करण्यात आले.

परिसरातील शेतकऱ्यांत पावसामुळे उत्साहाचे वातावरण आहे. आदिवासी शेतकऱ्यांनी गावांत शेतीशी संबंधित खरेदीसाठी गर्दी केली. बहुसंख्य शेतकऱ्यांनी भाताची लागवड सुरू केली आहे. काही ठिकाणी ती पूर्णही झाली आहे.

मुळापाणलोटातही पाऊस
मुळानदीच्या पाणलोट क्षेत्रातील हरिश्चंद्रगड परिसरातही सोमवार सकाळपर्यंत जोरदार पाऊस झाला. सोमवारी या भागातही पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे मुळा नदीच्या प्रवाहाचा कोतूळजवळचा जोर कमी झाला. मुळा धरणात नव्या पाण्याने भर पडून पाणीसाठा ५५३५ दशलक्ष घनफुटांपर्यंत पोहोचला.

पर्यटकांची गर्दी
या भागात पावसाचा जोर वाढल्याने सर्व धबधबे पूर्ण क्षमतेने कोसळत आहेत. त्यात विशेषत: कोलटेंभे, नेकलेस यांचा समावेश आहे. त्यामुळे पर्यटकांनी या परिसरात शनिवारी विशेष गर्दी केली होती. रविवारीही पर्यटकांच्या गर्दीला जोर राहणार आहे. त्यामुळे परिसर गजबजला आहे.

१२ तासांतील पाऊस
सोमवारी सकाळी नोंदवण्यात आलेला पाऊस पुढीलप्रमाणे (मागील २४ तासांतील पावसाचे आकडे मिलिमीटरमध्ये, कंसात आतापर्यंत झालेला पाऊस): भंडारदरा धरण परिसर १०४ (२०७) , घाटघर परिसर : २०६ (७२३), पांजरे : १६९ (४४७), रतनवाडी : २६९ (६४१), वाकी : १३९ (३१२).
आतापर्यंत झालेला पाऊस

तालुका मिलिमीटर
} अकोले २१०
} कोपरगाव ५८
} संगमनेर ८८
} राहाता ५५
} श्रीरामपूर ११६
} राहुरी १५३
} नेवासे ५५
} नगर १४७
} शेवगाव २१३
} पाथर्डी २०५
} पारनेर १७
} कर्जत २२८
} श्रीगोंदे ८५
} जामखेड १४३

धरणांतील पाणीसाठा (आकडे दशलक्ष घनफुटांत)
भंडारदरा: १९०० दशलक्ष घनफूट (सोमवारी सायंकाळी सहापर्यंत), मुळा : ५५३५ दशलक्ष घनफूट, निळवंडे : ४६९, आढळा : १४१.

जिल्ह्यात २५.२२ टक्के पाऊस
जूनते जुलैपर्यंत जिल्ह्यात २५.२२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक ४५.१५ टक्के पावसाची नोंद कर्जत तालुक्यात झाली असून, सर्वात कमी पावसाची नोंद पारनेर तालुक्यात (३.५९ टक्के) झाली आहे. अकोले कर्जत वगळता अन्य तालुक्यांत २०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद अजून झालेली नाही.
बातम्या आणखी आहेत...