आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ivory Coast Country's Company Make A Shri Ganesh Coins

‘आयव्हरी कोस्ट’ देशाने काढले श्रीगणेशाच्या प्रतिमेचे नाणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आबालवृद्धांसह सर्वांचा आवडता गणेशोत्सव अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपला आहे. यानिमित्त देशभरात आनंदाचे वातावरण आहे. या गणेशोत्सवाची क्रेझ परदेशातही आहे. आफ्रिका खंडातील आयव्हरी कोस्ट या देशातील एका कंपनीने गणेशाची 1 हजार नाणे उपलब्ध केली आहेत. नगर येथील हरजितसिंग वधवा यांनी सर्वप्रथम हे नाणे खरेदी केले आहे.

गणेशोत्सवानिमित्त विविध भेटवस्तू दिल्या जातात. या भेटवस्तूंवर श्रीगणेशाचे चित्र असते. भेटवस्तू म्हणून श्रीगणेशाचे चित्र असलेली नाणी दिली जातात. ही क्रेझ परदेशातही आहे. तेथेही भेटवस्तू म्हणून श्रीगणेशाची नाणी दिली जातात. आयव्हरी कोस्ट या देशातील एका कंपनीने गणेशाची 1 हजार नाणी उपलब्ध केली आहेत. वधवा यांना देवी, देवतांची चित्रे असलेली नाणी गोळा करण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे थायलंडसह विविध देशांची नाणी संकलित आहेत.

अफ्रिकेतील आयव्हरी कोस्ट या देशात श्रीगणेशाचे नाणे उपलब्ध असल्याची माहिती मिळताच, त्यांनी त्याचे ऑनलाइन बुकिंग करून 8 हजार 100 रुपयाला खरेदी केले. वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या या नाण्याबरोबरच श्री गणेशाची महती सांगणारे माहिती पत्रकही देण्यात येते.

पत्रकाबरोबरच एका घडीवर पिंपळाचे पान व त्यावर सोनेरी रंगात श्रीगणेशाचा आकार काढलेला आहे. नाण्यावर देवनागरी लिपीत ‘वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषू सर्वदा’ हा श्लोक लिहिला आहे. नाण्याच्या मागील बाजूस हत्तीचा मुखवटा व आयव्हरी कोस्ट या देशाचे नाव लिहिले आहे.