आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगन्नाथाची रथयात्रा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर येथील खाकीदास बाबा (माहेश्वरी) मठ ट्रस्टच्या वतीने रविवारी दुपारी जगन्नाथ पुरीला जशी रथयात्रा निघते, तशी रथयात्रा काढण्यात आली. देशात जगन्नाथ पुरी, अहमदाबाद व अहमदनगरमध्येच अशी मिरवणूक काढली जाते. ‘रथयात्रा पंखिडा तू पंखिडा’सह इतर गाण्यांवर महिलांनी फेर धरला. मिरवणुकीचे प्रमुख यजमान रामविलास प्रेमसुख झंवर होते. रथयात्रेत पाचशे महिला व पुरुष सहभागी झाले होते. ट्रस्टचे अध्यक्ष दीपक काबरा, चंद्रकांत काबरा, रमेश असावा, मोहनलाल मानधना, चंद्रकांत गट्टाणी, आर. डी. मंत्री, पिटू बोरा, संजय ढोणे यांनी रथयात्रेचे नियोजन केले. दर्शनासाठी शहरासह जिल्ह्यातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रथयात्रा संपल्यानंतर मंदिरात संध्याकाळी आरती करण्यात आली. आरतीनंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.