आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगताप खटल्याची सुनावणी लांबणीवर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जागेच्या वादातून दाखल केलेली फिर्याद मागे घेण्यासाठी मारहाण केल्याप्रकरणी आमदार अरुण जगताप यांच्यासह सातजणांविरुद्धच्या खटल्याची सुनावणी आता 13 फेबु्रवारीपासून सुरू होणार आहे. सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे रजेवर गेल्याने सोमवारपासून सुरू होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली.
2001 मध्ये ही घटना घडली होती. मिलिंद मोभारकर यांना रस्त्यात अडवून मारहाण झाली होती. याबाबतची फिर्याद मागे घ्यावी, म्हणून त्यांच्यावर दबाव येत होता. त्यामुळे जगताप व बाळासाहेब बोराटे यांच्यावर मोक्का लावण्याची मागणी मोभारकर यांनी केली होती. त्यामुळे चिडलेल्या आरोपींनी 23 जानेवारी 2001 रोजी मोभारकर यांना मारहाण केली. याप्रकरणी जगताप, बोराटे, चंद्रकांत औशीकर, नंदकुमार बोराटे, अनिल बोंडगे व समीर शेख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.