आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jai Mahavir Anand Mahila Mandal,Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पौष्टिक मोदकांमुळे आरोग्य राहते चांगले, डॉ. कांकरियांचे प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पौष्टिक मोदकांमुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत येते. त्या दृष्टिकोनातून जय आनंद महावीर महिला मंडळाचा मोदक बनवा स्पर्धेचा उपक्रम स्तुत्य आहे, असे प्रतिपादन नेत्रतज्ज्ञ डॉ. सुधा कांकरिया यांनी केले. गणेशोत्सवानिमित्त जय आनंद महावीर मंडळाच्या वतीने मोदक बनवा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात डॉ. कांकरिया बोलत होत्या. परीक्षक चंदेज कुकींग क्लासेसच्या दीपा चंदे, मंडळाचे अध्यक्ष शैलेश मुनोत, सचिव सत्येन मुथा, महिला मंडळाच्या अध्यक्ष संगीता भंडारी, सचिव सुवर्णा मुथा आदी यावेळी उपस्थित होते.
स्पर्धेत ५० महिलांनी भाग घेऊन विविध प्रकारचे मोदक सादर केले. यात शाही मोदक, पनीर मोदक, शाही बनारसी मोदक, रोझ व नटस् मोदक, तिरंगा मोदक, उकडीचे मोदक, पानाचे मोदक आदींचा समावेश होता. मोदक सादरीकरणातून पर्यावरण, पाणी वाचवा व मुली वाचवा असे संदेशही महिलांनी दिले.

डॉ. कांकरिया म्हणाल्या, स्त्री हे आदिशक्तीचे स्वरुप आहे. तिचा सन्मान केला गेलाच पाहिजे. म्हणूनच सर्वांनी स्त्री जन्माचे मनापासून स्वागत करुन स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी व्यापक प्रयत्न केले पाहिजेत.
प्रास्‍ताविक करताना संगीता भंडारी म्हणाल्या, महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा हा मंडळाचा हेतू आहे. त्यासाठी वर्षभर मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व, मोदक बनवा यासह अनेक स्पर्धा व कार्यक्रम घेतले जातात. या स्पर्धेतून महिलांना नवीन शिकण्याची संधी मिळते. स्पर्धेत अमृता नवल यांना पहिले पारितोषिक मिळाले. द्वितीय कविता शिंगवी, तृतीय शुभांगी यशवंत, तर उत्तेजनार्थ स्नेहल छाजेड यांना मिळाले. सूत्रसंचालन सोना डागा यांनी केले. भारती गांधी, भारती गुंदेचा, दीपाली मुनोत, स्वाती गांधी, पिंकी राका, सुमित्रा औस्तवाल, सोनाली बोरा, पूजा गांधी, सविता मुथा, स्वाती चंगेडिया, सविता गुंदेचा, गुंजन भंडारी आदी यावेळी उपस्थित होत्या.