आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जायकवाडीत पाणी येण्याचा मार्ग मोकळा, पाणीवाटप निर्णय रद्द करण्यास नकार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी - समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडीला पाणी सोडण्याचा आदेश रद्द करण्यास जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने मंगळवारी (११ नोव्हेंबर) नकार दिला. त्यामुळे नगर जिल्ह्यातून जायकवाडीत पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मंगळवारी जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने सुनावणी ठेवली होती. नगर जिल्ह्यातील शेतकरी, कारखानदार यांचे प्रतिनिधी भूमिका मांडण्यासाठी उपस्थित होते. प्राधिकरणाचे सदस्य चित्रकला धुन्सी व एस. वाय. सोडल यांच्या उपस्थितीत झालेल्या सुनावणीत समन्यायी पाणीवाटप कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या मेंढेगिरी समितीच्या शिफारशींमध्ये जायकवाडीच्या पाण्यासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी गोदावरी खोरे महामंडळाने करावी,
असे सुचवण्यात आलेे. सध्या मुळा धरणाचे रब्बीचे पहिले शेतीचे आवर्तन सुरू आहे. आवर्तन संपल्यावर उपयुक्त १३ टीएमसी (मृतसाठा वगळता) केवळ पाणीसाठा शिल्लक राहणार असल्याने रब्बीचे एक (जानेवारीअखेर), तर उन्हाळी केवळ एकाच आवर्तनावर सिंचनाची तहान भागवावी लागणार असल्याचे संकेत आहेत. ऊस लागवडीवरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आदेश रद्द करावा अशी नगरकरांची मागणी होती.
दुष्काळग्रस्त भागाला पॅकेज : खडसे
मुंबई | राज्यातील दुष्काळग्रस्त मराठवाडा व विदर्भाला लवकरच पॅकेज जाहीर करण्यात येईल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी गुरुवारी सांगितले. खडसे म्हणाले, आपण लवकर ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासह मराठवाड्याचा दौरा करणार आहोत. ८ डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. अधिवेशनात दुष्काळग्रस्त भागासाठी पॅकेजची घोषणा करण्यात येईल. आणेवारीचा अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही मदत जाहीर करण्यात येईल, असेही खडसे यांनी सांगितले.