आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई करा, जैन समाजाची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जैनमुनी नयनपदम सागरजी यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा सकल जैन समाजाने गुरूवारी निषेध केला. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेऊन राऊत यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. सकाळी ११ वाजता धार्मिक परीक्षा बोर्ड येथे सभा घेऊन मोर्चाला सुरूवात झाली. खासदार दिलीप गांधी आमदार संग्राम जगताप मोर्चात सहभागी झाले होते. 

जैन समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभय महाजन यांना दिलेल्या िनवेदनात म्हटले आहे की, जैनमुनी समाजाला दिशा देतात. राऊत यांनी मात्र त्यांच्या विरोधात बेताल वक्तव्य केले. मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत झालेला पराभव शिवसेनेला पचनी पडलेला नाही. त्यामुळे राऊत यांचे मानसिक संतूलन बिघडले आहे. असंसदिय वक्तव्य करून जैन समाजाला लक्ष्य केले जात अाहे. जैन धर्माची तत्त्वे काय आहेत, हे नयनपदम सागरजी यांनी मीरा-भाईंदर शहरात सांगितले. त्याचा राग येऊन राऊत यांनी हे बेताल वक्तव्य केले. राऊत यांनी त्यांना अतिरेकी म्हटले. भगवान महावीर जैन धर्माच्या २४ तीर्थकारांनी आचरणात आणलेली जीवनपध्दती जैन धर्माचा हजारो वर्षांचा इतिहास जनतेपर्यंत प्रवचनातून समाजाला देण्याचे काम जैनमुनी करतात. राऊत यांनी जैन महिलांबद्दलही अनुचित उदगार काढले. त्यामुळे सकल जैन समाजात असंतोष निर्माण झाला आहे. राऊत यांनी बिनशर्त जाहीर माफी मागावी, तसेच लोकप्रतिनिधी असताना दोन हजार ४०० वर्षांची परंपरा असलेल्या धर्माचा जैनमुनींचा अपमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सकल जैन समाजाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. 

यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक सुवेंद्र गांधी, विपुल शेटिया, माजी नगरसेवक संजय चोपडा, िकशोर बोरा, सुमित बोरा, सुमित वर्मा, बाबुशेठ बोरा, कमलेश गांधी, अजय बोरा, पिटू बोरा, गौरव ढोणे, प्रकाश भागानगरे आदी उपस्थित होते. 

राष्ट्रवादीकडून जोडे 
राष्ट्रवादीच्या वतीने भिंगारवाला चौकातील जैन मंदिरासमोर खासदार राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे, दत्ता सप्रे, पोपट बारस्कर, विद्यार्थी संघटनेचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, जॉय लोखंडे, सारंग पंधाडे, बाबासाहेब गाडळकर, नीलेश बांगरे, अॅड. वैभव मुनोत, गौतम भांबळ, स्वप्निल ढवण, दीपक खेडकर, किरण पंधाडे, मोना विधाते, समीर भिंगारदिवे, पप्पू पाटील, योगेश राऊत, संजय दिवटे, मतीन ठाकरे, अंकुश मोहिते, सतीश शिरसाठ, शुभम लोटे, योगेश होगले, योगेश करांडे आदी उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...