आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जैन साधूच्या हत्येचा विविध संघटनांच्या वतीने निषेध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- रायगड जिल्ह्यातील पोटनेर येथे झालेल्या जैन साधू प्रशांतविजय यांच्या हत्येचा ओसवाल पंचायत सभेने निषेध केला. अहमदनगर ओसवाल पंचायत सभा, बडीसाजन जैन श्रीसंघ, दिगंबर जैन मूर्तिपूजक, श्वेतांबर जैन मूर्तिपूजक संघ व सकल जैन समाज बांधव यांच्या वतीने पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांना निवेदन देण्यात आले. आमदार अनिल राठोड यावेळी उपस्थित होते.
जैन साधू-साध्वी समाजाच्या कल्याणाचे काम करतात. अहिंसेचे महत्त्व पटवून देण्यासाठी ज्यांनी आपले आयुष्य घालवले, त्यांची अशा प्रकारची हत्त्या होणे धक्कादायक आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना आहे, असे निवेदनात म्हटले आहे. या घटनेचा जामखेड येथेही निषेध करण्यात आला. कोठारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय कोठारी यांनी आरोपींवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. जैन साधू संपूर्ण भारतात पायी फिरत असतात. त्यामुळे जैन साधूंना तातडीने संरक्षण द्यावे, असे ते म्हणाले.
आरोपींना अटक करा
ही घटना दुर्दैवी आहे. आम्ही अहिंसा मानणारे आहोत. हल्ला करणा-या आरोपींना पोलिसांनी तातडीने अटक करावी. आरोपींवर कठोर कारवाई न झाल्यास जैन संघटनांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.
-संजय चोपडा, अध्यक्ष, ओसवाल पंचायत सभा