आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"जलयुक्त शिवार अभियान'चे थेट मुख्यमंत्र्यांना रिपोर्टिंग...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- भाजप सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेले जलयुक्त शिवार अभियान यशस्वी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यात लक्ष घातले आहे. नगर जिल्ह्यासह राज्यात राबवण्यात येत असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाचा दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासन थेट मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात खास वॉर रुम तयार करण्यात आली आहे.

पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी विविध योजना राबवण्यासाठी पंतप्रधान कार्यालयात वॉर रुम तयार केली. त्याच धर्तीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनीही मुंबईतील आपल्या कार्यालयात अशा प्रकारची वॉर रुम तयार केली आहे. सरकारने "टंचाईमुक्त महाराष्ट्र' ही संकल्पना पुढे ठेवून राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे अभियान राबवण्यासाठी सरकारने एक हजार कोटींची तरतूद केली आहे.
आधी हे अभियान १ जानेवारीपासून राज्यात सुरू होणार होते. प्रक्रिया पूर्ण न झाल्याने ते लांबणीवर पडले होते. आता नगरसह राज्यात २६ जानेवारीपासून या अभियानाला पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात होत आहे. या अभियानासाठी राज्यातील प्रत्येक िजल्ह्यात क्लोज मॉनिटरिंग यंत्रणा बसवण्यात आली आहे. या यंत्रणेद्वारे या अभियानाचा दररोजचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयातील वॉर रुमला देण्यात येणार असून, येणाऱ्या अहवालांवर मुख्यमंत्री स्वत: लक्ष ठेवणार आहेत.

५ गावे दत्तक घेणार
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत निवडलेली गावे ही टंचाईग्रस्त व पाण्याचे स्त्रोत कमी असलेली असणार आहेत. हे अभियान राबवण्यासाठी गावागावांत िशवार फेऱ्या काढण्यात येणार आहेत. अभियानांतर्गत प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना प्रत्येकी पाच गावे दत्तक घेण्याच्या सूचना सरकारच्या वतीने देण्यात आल्या आहेत.

२७९ गावांची निवड
जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्ह्यातील २७९ गावांची निवड करण्यात आली आहे. पावसाच्या पाण्याचे त्याच क्षेत्रात नियोजन करणे, विक्रेंद्रित पाणीसाठे तयार करणे हा अभियानाचा मुख्य हेतू आहे. क्लोज माॅनेटरिंगद्वारे दररोजचा अहवाल मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन असेल.'' अंकुश माने,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.