आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवार अभियानामुळे शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बदलेल- अण्णा हजारे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर "जलयुक्त'मुळे शेतकऱ्यांचे अर्थशास्त्र बदलेल, असा विश्वास ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केला. कृषी विभागाच्या वतीने राळेगणसिध्दी, पळसे बुद्रूक, पळसे खुर्द या भागात जलयुक्ततून तळे तयार करण्यात आली आहेत. त्यात पावसामुळे साचलेल्या पाण्याचे पूजन हजारे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अंकुश माने, प्रांताधिकारी सुधाकर बोऱ्हाळे, तालुका कृषी अधिकारी रामदास दरेकर आदी यावेळी उपस्थित होते.

हजारे म्हणाले, गावाची अर्थव्यवस्था बदलली, तर देशाची अर्थव्यवस्था बदलेल. पावसाचा पडणारा थेंबन््थेंब शेतात अडवला गेला पाहिजे. शेतातील पाणी शेतातच जिरवले पाहिजे. कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार अभियानाचे हेच मूळ उद्दिष्ठ अाहे. राळेगणची अवस्था ४० वर्षांपूर्वी काय होती आज काय आहे, हे आपण सर्वजण जाणता. हे केवळ जलसंधारणामुळे शक्य झाले आहे. जलयुक्त शिवार अभियानात लोकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. जलयुक्त अभियान योग्य पध्दतीने राबवल्यास पाण्याचा प्रश्न सुटेल.

प्रभाकर देशमुख म्हणाले, जलसंधारणासाठी राज्यातीस हजार गावांची निवड केली आहे. त्यासाठी हजार कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे.