आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळी नगर तालुक्याला जलयुक्त शिवारचा आधार; 30 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्ह्यातील कोणतीही शाश्वत सिंचनाची सोय नसणारा एकमेव तालुका म्हणजे नगर. दुष्काळी तालुका म्हणूनच त्याची ओळख आहे. तीस वर्षांपूर्वी २७३ पाझर तलाव आणि १२ एमआय टँकमुळे पाझर तलावांचा तालुका म्हणून नगरकडे पाहिले जात होते. पण जसजसा या तलावांत गाळ साचत गेला, तशी उत्पादनात घट होऊन येथील शेतकरी आर्थिक विवंचनेत पडले. पण जलयुक्त शिवारमुळे गतवैभव प्राप्त होण्याची आशा दिसू लागली आहे. ज्या गावात जलयुक्तची कामे झाली, तेथील भूजल पातळीत कमालीची वाढ झाली आहे. 


१९७२ च्या दुष्काळाच्या झळा सोसल्यानंतर तत्कालीन आमदार कि. बा. म्हस्के यांनी पाझर तलावांचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेतले. नंतरही तत्कालीन आमदार दादापाटील शेळके यांनीही तलावांच्या कामांवर मोठा भर दिला. जिल्हा परिषद आणि स्थानिक स्तर माध्यमातून तब्बल २७३ पाझर तलाव आणि १२ एमआय टँक बांधले गेले. त्यामुळे सिंचनात वाढ झाली. मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झाल्याने राहुरी, प्रवरा, कोपरगाव, संजीवनी, श्रीगोंदे या साखर कारखान्यांना नगर तालुक्यातून ऊस जाऊ लागला. 


काळाच्या ओघात पाझर तलाव गाळाने भरले. त्यामुळे सिंचनाचे क्षेत्र घटत गेले. भूजल पातळी घटत गेली आणि तालुक्याची वाटचाल दुष्काळाकडे होत गेली. गेल्या २० वर्षांत तालुक्याने पाण्याच्या दुर्भिक्षाची अनेक संकटे झेलली. पण जलयुक्त शिवार योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या. 


जलयुक्त शिवारमध्ये पहिल्या वर्षी १८ गावांमध्ये कोटी ३१ लाखांची कामे झाली. दुसऱ्या वर्षी २१ गावांची निवड होऊन तेथे कोटींची कामे झाली. २०१७-१८ मध्ये २० गावांत जलयुक्तची कामे सुरू आहेत. बांधबंदिस्ती, नदी, नाले खोलीकरण, रूंदीकरण, समतल चर अशी विविध प्रकारची कामे झाल्याने गावातील पाणी गावातच जिरवण्याचे काम झाले. परिणामी भूजल पातळीत लक्षणीय वाढ झाली. 


जलयुक्त शिवार योजनेतील गावांची सिंचन क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वय वर्ष ८० च्या पुढे असलेले अनेक नागरिक आम्ही आजवर एवढी चांगली पाणीपातळी पाहिलीच नाही, असे सांगतात. 

 
राजकारणाचा फटका 
पहिल्यावर्षी १८ गावांसाठी १३ कोटींचा आराखडा होता. त्यापैकी कोटी ३१ लाखांची कामे होऊ शकली. दुसऱ्या वर्षी २१ गावांसाठी कोटींचा आराखडा करण्यात आला, पण कोटींचीच कामे झाली. यावर्षी २० गावांचा १४ कोटींचा आराखडा करण्यात आला. पण मंजूर आराखड्याच्या ६० ते ६५ टक्केच काम होत आहे. राजकारण आणि हेव्यादाव्यांमुळे अनेक कामे होऊ शकत नाहीत. 

 

जलयुक्त शिवार योजनेतील गावे 
२०१६-१७- चास, निमगाव वाघा, भोयरे खुर्द, गुंडेगाव, पारगाव भातोडी, हातवळण, वाटेफळ, तांदळी वडगाव, चिचोंडी पाटील, बारदरी, रांजणी, सारोळा बद्धी, जखणगाव, निमगाव घाणा, भोयरे पठार, भोरवाडी, मांजरसुंबा, मदडगाव. २०१७-१८ : बाबुर्डी बेंद, खडकी, साकत, दहिगाव, हिवरे झरे, वाळकी, पारगाव मौला, आठवड, कापूरवाडी, अकोळनेर, जाधववाडी, घोसपुरी, सारोळा कासार, पिंपळगाव माळवी, पांगरमल, खोसपुरी, उदरमल, मजले चिंचोली, बहिरवाडी, इमामपूर, धनगरवाडी. २०१८-१९ - शेंडी, ससेवाडी, डोंगरगण, पोखर्डी, जेऊर, पिंपळगाव उज्जैनी, आव्हाडवाडी, मांडवे, पिंपळगाव लांडगा, कौडगाव, देऊळगाव सिद्धी, रूईछत्तीसी, उक्कडगाव, बाबुर्डी घुमट, वडगाव तांदळी, नेप्ती, हिंगणगाव, पिंपळगाव वाघा, कामरगाव, पिंपळगाव कौडा. 


शेतकऱ्यांनी साथ द्यावी 
जलयुक्तच्या कामांमुळे पाण्याचे पुनर्भरण साठवणूक क्षमता वाढणार आहे. पिकांची उत्पादकता वाढून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावेल. शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच ही योजना आहे. गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. गावकऱ्यांची साथ आणि सकारात्मक प्रतिसाद मिळेल तेवढी कामे जास्त होतील.
- बाळासाहेब नितनवरे, कृषी अधिकारी नगर तालुका. 

बातम्या आणखी आहेत...