आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jamkhed Midc Problem, One Project In 15 Years At Jamkhed

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जामखेडमध्ये अनास्था, पंधरा वर्षांत एकच प्रकल्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड: तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी ठरलेले प्रकल्प फक्त भूमिपूजनापुरतेच र्मयादित राहिले आहेत. गेल्या पंधरा वर्षांत केवळ खर्डा येथील 132 के. व्ही. वीज उपकेंद्राखेरीज कोणताही प्रकल्प पूर्ण झालेला नाही. अनेक प्रकल्प अपूर्ण असून काहींचे तर केवळ कागदोपत्रीच अस्तित्व उरले आहे.
भुतवडा जोडतलाव, अमृतलिंग लघू पाटबंधारे तलाव, औद्योगिक वसाहत, जामखेड शहरासह तालुक्यातील 45 गावांसाठी तब्बल 27 कोटी रुपये खर्चाच्या जीवन प्राधिकरणाच्या नळ पाणीपुरवठा योजना, जामखेड बसस्थानकासमोरील व्यापारी संकुल या कामांचे केवळ भूमिपूजन झाले. पुढे काम सरकलेच नाही. भाजप - सेना युती सरकारने तालुक्यातील विविध विकास कामांना निधी दिला होता. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे तत्कालीन आमदार सदाशिव लोखंडे यांचे यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान होते. सत्ताधारी पक्षाचे आमदार असल्याने त्यांनीही तालुक्यातील विकासकामांना तातडीने निधी मिळवण्यासाठी प्रय} केले. नंतर राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार आणि आमदार भाजपचे असे सूत्र राहिल्याने राज्य सरकारकडून जामखेडला सापत्न वागणूक मिळाली. ती वागणूक आजही कायम आहे.
6 मे 1999 रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पाटबंधारे मंत्री एकनाथ खडसे व खासदार बाळासाहेब विखे यांच्या उपस्थितीत विविध विकासकामांचे भूमिपूजन जामखेड येथे झाले. त्यामध्ये औद्योगिक वसाहत, भुतवडा जोडतलाव व जामखेड शहर पाणीपुरवठा योजना या कामांबरोबरच अमृतलिंग लघू पाटबंधारे तलाव व खर्डा नळ पाणीपुरवठा योजना या कामांचा समावेश होता. यापैकी भुतवडा जोडतलाव व अमृतलिंग लघू पाटबंधारे तलाव आजही अपूर्ण आहेत. औद्योगिक वसाहतीची जमीन अद्यापि विकसित झालेली नाही. जामखेड व खर्डा शहराच्या पाणीपुरवठा योजना राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आघाडी सरकारने रद्द केल्या. या दोन्ही योजना आठ कोटी 57 लाख रुपये खर्चाच्या होत्या. या दोन गावांच्या पाणीपुरवठा योजनांबरोबरच तालुक्यातील सुमारे 45 गावांच्या 27 कोटी रुपये खर्चाच्या योजना रद्द झाल्या होत्या.
राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार हे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सदस्य असताना त्यांच्या कार्यकाळात जामखेड बसस्थानकासमोर भव्य व्यापारी संकुल बांधण्याचे काम हाती घेण्यात आले. शेलार यांच्याच हस्ते भूमिपूजन होऊन पुढे या कामासाठी कॉलमचे खड्डे घेण्यात आले. खड्डे झाले मात्र, कॉलम अद्याप उभा राहिला नाही.