आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हातार्‍या पतीबरोबर तरुणीला नांदावयास जाण्याचा फतवा मागे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर - साठ वर्षांच्या म्हातार्‍याबरोबर एक रात्र नांदावयास जाण्याचा फतवा शुक्रवारी मागे घेत तरुणीला दुसरा विवाह करण्यास जात पंचायतीने परवानगी दिली. सन 1996 मध्ये राहुरी तालुक्यातील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी ताया लोखंडे तुरुंगात असताना जात पंचायतीने त्याच्या पत्नीचा विवाह दुसर्‍याशी लावला. सुटून आल्यावर त्याने पत्नीची मागणी केली. तडजोड म्हणून पहिल्या पत्नीच्या लहान बहिणीशी त्याचा विवाह लावण्यात आला. मुलगी मोठी झाल्यानंतर तिने नांदावयास येण्याची मागणी तायाने केली. मात्र, मुलीने ती फेटाळली. केवळ एक रात्र मुलीने या म्हातार्‍याकडे जावे, असा अजब निर्णय पंचायतीने दिला. मुलीने या निर्णयाविरोधात लढण्याचे ठरवले. मढी येथे जात पंचायतीत सुमारे दोन हजारांच्या जमावापुढे पंचांनी चर्चा करून मुलीस हव्या त्या तरुणाशी दुसरा विवाह करण्यास मुभा असल्याचा निर्णय शुक्रवारी दिला.