आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काविळच्या साथीवर आयर्वेदाची अचूक मात्रा 'आयुर्वेद व्यासपीठ' तर्फे काविळीवर मोफत उपचार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- काविळीची साथ आटोक्यात आणण्याबाबत महापालिका प्रशासन झोपलेले असले, तरी 'आयुर्वेद व्यासपीठ' या आयुर्वेद पदवीधरांच्या संघटनेतर्फे काविळीची साथ असलेल्या भागातील रुग्णांवर मोफत आयुर्वेदिक उपचार करण्यात येत आहेत. आगरकर मळा भागात संघटनेने सुमारे दीडशे रुग्णांवर उपचार केले आहेत. त्यांचा चांगला लाभही रुग्णांना होत आहे. आयुर्वेद व्यासपीठच्या या उपक्रमाचे कौतूक होत आहे. आयुर्वेद व्यासपीठ शिक्षण, प्रसार, संशोधन व सेवा या चतु:सूत्रीद्वारे कार्य करते. नगर शहरात सध्या काविळची साथ पसरली आहे. सामाजिक स्वास्थ्याचा विचार करून व आयुर्वेदातील प्रभावी औषधांचा रुग्णांना उपयोग व्हावा, यासाठी संघटनेतर्फे आगरकर मळा भागात दररोज कावीळ उपचार शिबिर आयोजित करण्यात येत आहे.
सागर कॉम्प्लेक्समध्ये प्रवीण गांधी यांच्या जागेत सकाळी ८ ते १० असे दोन तास आयुर्वेद व्यासपीठाचे कार्यकर्ते सेवा देतात. नोंदणी शुल्क १० रुपये घेण्यात येते. मात्र, औषधे मोफत देण्यात येतात. काविळीची साथ संपेपर्यंत हे शिबिर चालू ठेवण्यात येणार असल्याची माहिती वैद्य राजा ठाकूर यांनी दिली.

या शिबिराचा २२ बालकांसह १३५ रुग्णांनी आतापर्यंत लाभ घेतला आहे. उपचारास चांगला प्रतिसाद मिळत असून रोगाची लक्षणे कमी होत आहेत. किमान ५ ते ७ दिवसांच्या उपचारांनंतर रक्ताची तपासणी करून घेण्यास सांगण्यात येणार आहे.

उपचारांसाठी वैद्य राजा ठाकूर, लक्ष्मीकांत कोर्टीकर, विलास जाधव, मंदार भणगे, मंगेश काळे, शौनक मिरीकर, अनिकेत घोटणकर, महेश मुळे, अनिल गुंड, रोहित ढाकेफळकर, प्रमोद पालवे, सुस्मिता ठाकूर, वर्षा कोर्टीकर, राजन मुळे, रमेश राजगुरू, विक्रम म्हसे, अंशू मुळे, सागर महाजन, अजहर शेख, सागर गोपाळ, चांद शेख आदी परिश्रम घेत आहेत. या उपक्रमासाठी अ‍ॅड. अभय आगरकर, अ‍ॅड. सुधीर झरकर, शरद नगरकर, प्रमोद कुलकर्णी आदींचे सहकार्य मिळत आहे. किरण अंत्रे हे सवलतीच्या दरात रक्त व लघवी तपासणी करून देत आहेत, अशी माहिती वैद्य ठाकूर यांनी दिली.
काय खावे : पाणी उकळून प्यावे, ताजे अन्न खावे, ज्वारीची भाकरी, भात, मुगाचे वरण व फुलके, लोणी काढलेले ताजे ताक, भाज्या, कोवळा मुळा, भेंडी, घोसाळे, दुधी भोपळा, दोडका, लाह्या : ज्वारी, राजगिरा, साळी, अंबाडी चुका, अंजीर, चाकवत, राजगिरा, नारळाचे पाणी, शहाळे.
काय खाऊ नये : उघड्यावरील अन्न, शिळे अन्न, तेलकट, तळलेले, मसालेदार पदार्थ, आंबवलेले पदार्थ, बेकरी पदार्थ लोणचे, पापड, चटणी, केळी, चिकू, भाज्या- मेथी, शेपू, आळू, पालक, तांदुळजा, चहा, कॉफी, शीतपेये, फ्रीजमधील पाणी, अल्कोहोलयुक्त पेये.