आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे हत्याकांड : प्रशांत जाधवची कोठडी चार दविसांनी वाढली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - बहुचर्चित जवखेडे तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी प्रशांत दिलीप जाधव याची पोलिस कोठडी शनविारी पाथर्डीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विजय चौगुले यांनी चार दविसांनी वाढवली.
जवखेडे हत्याकांडाचा गुंता उकलताना पोलिसांनी मृत संजय जगन्नाथ जाधव यांचा पुतण्या असलेल्या प्रशांतला ३ डिसेंबरला अटक केली. त्याला दहा दविसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. कोठडीची मुदत संपल्याने शनविारी त्याला न्यायालयात आणण्यात आले. आरोपीकडून अपूर्ण व संदिग्ध स्वरूपाची माहिती देण्यात येत असल्याचे म्हणणे सरकार पक्षाने न्यायालयात मांडले. मृतांच्या मोबाइलची विल्हेवाट कोठे व कशी लावली. गुन्ह्याच्या वेळी वापरलेले कपडे कोठे टाकले, अन्य आरोपींचा शोध घेण्यासाठी प्रशांतच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकार पक्षाकडून अॅड. शविाजी दराडे यांनी केली. आरोपीच्या वतीने अॅड. अमोल पालवे व अॅड. राजेंद्र खेडकर यांनी युक्तविाद केला. आरोपी दलित समाजाचा असतानाही दलित अत्याचार प्रतिबंध कायद्याचे कलम लावण्यात आले आहे. अकरा दविस आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे. कोठडी न वाढवण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली. दोन्ही बाजूचा युक्तविाद ऐकून न्यायालयाने प्रशांतच्या कोठडीत वाढ केली.
दरम्यान, प्रशांतचा भाऊ अशाेक दिलीप जाधव यालाही ७ डिसेंबरला अटक झाली. त्याला १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास यंत्रणांनी दोघा आरोपी भावांकडील तपासातून आठ ते दहा आरोपी निश्चित केले आहेत. यातील काही संशयित गेल्या तीन ते चार दविसांपासून पसार झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्ह्यात वापरल्याचा संशय असणाऱ्या जीप व इतर मुद्देमालाच्या न्याय वैद्यक पथकाच्या तपासणी अहवालाची पोलिसांना प्रतीक्षा आहे.