आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे हत्याकांडाचा तपास लावावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथे झालेल्या तिहेरी दलित हत्याकांडाचा तातडीने तपास लावावा, अशी मागणी रुद्राक्ष सामाजिक युवा प्रतिष्ठान अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

या तिहेरी हत्यांकाडाचा लवकर तपास लावून घटनेमागील सत्यता समोर आणावी. या हत्याकांडामुळे संपूर्ण जिल्हा भयभीत झाला आहे. अशा घटना पुढील काळात घडू नयेत, दरोडेखोर तसेच हत्याकांड घडवून आणणाऱ्या आरोपींवर कायद्याचा धाक बसला पाहिजे. रात्रीच्या वेळी जिल्हाभर पोलिसांची गस्त वाढवावी, असेही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात केली आहे. निवेदन देताना हर्षवर्धन कोतकर, मनोज पवार, अजित कोतकर, ऋषिकेश कोतकर, अभिजित काळे, संदेश शिंदे, गाैरव कार्ले, योगेश कोतकर, चैतन्य सांगळे, वैभव गुंड, राजेंद्र पाटील अादी उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांना निवेदन देताना हर्षवर्धन कोतकर, मनोज पवार, अजित कोतकर, ऋषिकेश कोतकर, अभिजित काळे, संदेश शिंदे आदी.