आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींच्या अटकेसाठी युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न, युवकाविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जवखेडे खालसा येथे झालेल्या तिहेरी हत्याकांडातील आरोपींना लवकर अटक करावी, या मागणीसाठी एका कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. सुशांत गिरीधर म्हस्के (वय 30, सर्जेपुरा) असे त्याचे नाव आहे. पोलिसांनी त्याला तत्काळ ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्याच्याविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
जिल्ह्यात काही वर्षांपासून दलितांवर अत्याचार होण्याचे प्रकार वाढले आहेत. जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडाला पंधरा दिवस उलटले, तरीही अद्याप पोलिसांना आरोपींचा शोध लागलेला नाही. त्याचा निषेध करण्यासाठी विविध दलित संघटनांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने केली जात आहेत. शुक्रवारी सकाळी सुशांत म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली दहा-पंधरा कार्यकर्ते जिल्हािधकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते. आरोपींना तत्काळ अटक करा, अशी घोषणाबाजी सुरू होती. सव्वाबाराच्या सुमारास सुशांत म्हस्के यांनी अचानक बरोबर आणलेला रॉकेलचा ड्रम अंगावर ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पण बंदोबस्ताला असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान राखून म्हस्के याला ताब्यात घेतले.
सीबीआय चौकशीची मागणी
हत्याकांडाची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी जिल्हा काँग्रेस कमिटीने जिल्हाधिका-याकडे केली. जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या मार्गदर्शनाखालील शिष्टमंडळात सत्यजित तांबे, धनंजय जाधव, दीप चव्हाण, अशोक पारधे आदींचा समावेश होता.