आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळात उमटणार, राज्यपालांना घेराव घालण्याचा इशारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दलित अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रशासन डोळेझाक करत असल्याने गुन्ह्यांचा तपास लागत नाही. जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडातील आरोपींचा तेरा दिवस उलटूनही शोध लागलेला नाही. या घटनेचा तपास तातडीने करावा; अन्यथा सर्व दलित कार्यकर्ते मुंबईत राज्यपालांना घेराव घालतील, असा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी रविवारी दिला.
जवखेडा तिहेरी हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी आयोजित परिषदेत पोटभरे बोलत होते. या वेळी भारतीय दलित महासंघाचे अध्यक्ष सुनील उमाप, अशोक गायकवाड, किसन चव्हाण, अरुण जाधव, सुनील क्षेत्रे, अजय साळवे, सुनील शिंदे, ना. म. साठे, विजय शेलार, कुंडलिक खरे, फिरोज शेख, पोपट शिंदे, बाबासाहेब शेलार, गुलाब गाडे उपस्थित होते. पोटभरे म्हणाले, नगर जिल्ह्यात वारंवार दलितांवर अत्याचाराच्या घटना होतात. त्यामुळे हा जिल्हा अत्याचारग्रस्त म्हणून जाहीर करावा. तपासाची सूत्रे वेगाने न फिरल्यास विधिमंडळ अधिवेशनात आंदोलन करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व दलित संघटनांनी या प्रश्नी एकत्र यावे. दलितांना संरक्षण देण्यासाठी शासनाने शस्त्र परवाने द्यावेत. समाजाविषयी प्रक्षोभक भाषणे करुन समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करावी.