आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे हत्याकांड : जाधव कुटुंबीयांना पोलिसांनी न्याय द्यावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जवखेडे हत्याकांडाचा सखोल तपास करून जाधव कुटुंबीयांना पोलिसांनी लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या शारदा घुले यांनी केली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या नेत्यांनी सामािजक शांतता भंग करणारी विधाने करण्याचे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केल.

पत्रकात म्हटले आहे, सांत्वन करण्यासाठी येणे गैर नाही, पण जबाबदारीचे भान ठेवून जनमताचा रोष लक्षात घेता बेताल व बेजबाबदार विधाने करण्याचे टाळावे, कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची काळजीही भेटायला येणाऱ्या नेत्यांनी घ्यावी. राजकीय मंडळींनी, संघटनांनी या घटनेचे भांडवल करणे, आरोप-प्रत्यारोप करणे चुकीचे आहे. असे प्रकार भविष्यात घडू नयेत म्हणून सकारात्मक प्रयत्न करणे आवश्यक आहे. राजकीय मंडळींनी अशा घटनांचा निषेध करताना संवेदनशीलता दाखवून समाजाच्या संरक्षणाची हमी कृतीद्वारे दाखवून द्यावी, असे पत्रकात म्हटले आहे.