पाथर्डी - नगर जिल्ह्यातील जवखेडे तिहेरी हत्याकांडातील मृत संजय जाधवचा भाऊ रवींद्र याला पोलिसांनी मुंबईत ताब्यात घेतले. आठ दिवसांपासून पोलिस त्याच्या मागावर होते. अटकेत असलेल्या आरोपींच्या नार्काे चाचणीत रवींद्रचे नाव पुढे आले हाेते. संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार आणखी आठ नावे पुढे आली त्यात दोन महिलांचा समावेश आहे.
पाेलिसांनी एका महिलेच्या घरात दोन वेळा झडती घेतली. मात्र याबाबत माहिती देण्यास नकार देण्यात आला. उर्वरित दोन संशयित मुंबईतच असल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे. रवींद्रला सोमवारी न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे.