आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे हत्याकांडात दुसरा आरोपी अटकेत, 12 दिवसांची पोलिस कोठडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - जवखेडे (ता. पाथर्डी) तिहेरी हत्याकांड प्रकरणातील दुसरा आरोपी अशोक दिलीप जाधव याला न्यायादंडाधिकारी व्ही. एम. चौघुले यांनी सोमवारी बारा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी तपास यंत्रणांनी रविवारी (७ डिसेंबर) रात्री उशिरा त्याला अटक केली होती. यापूर्वी अटक करण्यात आलेला आरोपी प्रशांत याचा अशोक हा सख्खा भाऊ आहे.
या गुन्ह्यात फिर्यादी प्रशांत दिलीप जाधव हाच आरोपी म्हणून न्यायालयापुढे हजर केला.
पुढील तपासात त्याचा भाऊ अशोक याची माहिती समोर आल्याने पोलिसांनी त्याला रविवारी रात्री अटक केली. अशोकला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायाधीशांनी आरोपी अशोकला १२ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याप्रकरणी आणखी दोन संशयित रडारवर असून त्यात एका महिलेचा समावेश आहे.