आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे तिहेरी हत्याकांड"ती' जीप तपास यंत्रणेच्या ताब्यात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - जवखेडे तिहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपींनी वापरलेली जीप मंगळवारी तपास यंत्रणांच्या पथकाने ताब्यात घेतली. न्यायवैद्यक प्रयोग शाळेच्या उच्चस्तरीय पथकाने बुधवारी जीप व मृताच्या मालकीची बेवारस िस्थतीत टाकून दिलेली राजदूत मोटारसायकलची तपासणी करून काही नमुने तपासणीसाठी घेतले. याबाबत संबंधित पथकाने माहिती देण्यास नकार दिला.
या हत्याकांडातील मृत संजय जाधव यांच्या मालकीची मोटारसायकल घरापासून काही अंतरावर सापडली होती. आरोपींनी पळून जाण्यासाठी वापरलेली जीप तपास यंत्रणांनी जप्त केली. या जीपची माहिती पकडलेल्या संशयितांनी दिल्यानंतर विविध पथकांनी मागील आठवड्यात जिल्हाभर शोधमोहीम राबवून कासार पिपळगाव परिसरात गुन्ह्याच्या दिवशी ज्याने गाडी चालवली तो चालक मात्र फरार झाला. पकडलेली जीप जाधव कुटुंबीयांपैकीच आहे. गुन्हा घडल्यानंतर अारोपी या वाहनातून व अन्य एका वाहनातून पसार झाल्याची यंत्रणांची माहिती आहे. या गुन्ह्याचा तपास कुटूंब व नातेवाईक यांच्या भोवती फिरू लागल्याचे लक्षत येताच काही कुटुंबीय व नातेवाईक फरार होत आहेत. एकाने तर मोबाइल घरीच फेकून देऊन पलायन केले. त्यामुळे तपास यंत्रणांचे काम आता अधिक सुलभ होत अाहे. आरोपी अशोक याला ताब्यात घेतल्यापासून पळून जाणाऱ्या संशयिताची संख्या वाढत आहे.

गुन्ह्यातील हत्यारे सापडली
या हत्याकांडातील अटकेत असलेल्या एका आरोपीच्या घरातून तपास यंत्रणांना बुधवारी सायंकाळी तपास पथकांना गुन्ह्यात वापरलेली धारदार हत्यारे सापडली. ही हत्यारे पथकाने ताब्यात घेऊन न्यायवैद्यक प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठवणार आहेत.