आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जवखेडे हत्याकांड: गुन्ह्यात वापरलेली जीप जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जवखेडे तिहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यात वापरलेली संशयित जीप (एमएच १५, के ६७६०) पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी जप्त केली आहे. जाधव कुटुंबीयातील आणखी एकाचे रक्तनमुनेही मंगळवारी घेण्यात आले आले. दरम्यान, जवखेडे ग्रामपंचायतीला आलेल्या पोस्टकार्डातून गाव बाॅम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.
गुन्ह्यात वापरलेली संशयित जीप तालुक्यातील कासार पिंपळगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आली आहे. याच जीपचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पाेलिस यंत्रणा गेल्या महिनाभरापासून कामाला लागली होती. पाथर्डी पोलिस ठाण्याच्या अावारात ही जीप लावण्यात आली आहे. दरम्यान, प्रशात दिलीप जाधव अशोक दिलीप जाधव या दोन सख्ख्या भावांना या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. ते दोघेही मृत संजय जाधव यांचे सख्खे पुतणे आहेत. मंगळवारी तपास यंत्रणांनी जाधव कुटुंबीयातील आणखी एकाचे रक्त नमुने घेतले आहेत. पोलिस कोठडीतील आरोपींकडून चौकशीत मिळत असलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांच्या वेगवान हालचाली सुरू आहेत. काही संशयितांवर पोलिसांची पाळत ठेवली असून अटकेतील आरोपींच्या संख्येत वाढ होणार आहे.

बॉम्बने उडवण्याची पोस्टकार्डद्वारे धमकी
जवखेडे ग्रामपंचायतीच्या नावाने आलेल्या पत्रात, या हत्याकांडात सहभागी असणाऱ्या ग्रामस्थांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करावी; अन्यथा मोटारसायकलवरून येऊन गावात बॉम्ब टाकण्याची धमकी दिली आहे. याचा ग्रामस्थांना त्रास होईल, असा दमही देण्यात आला आहे. पत्रावरील पत्ता मात्र, बुचकळ्यात टाकणारा आहे. जवखेडे, ता. श्रीरामपूर असा पत्ता लिहिलेला असतानाही हे पत्र पाथर्डी तालुक्यातील जवखेडे ग्रामपंचायतीला मिळाले आहे. तपास यंत्रणांना भरकटवण्याचा हा प्रयत्न असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले असून पाेलिस तपास करत आहेत.