आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांना राख्या बांधून चिनी मालावर बहिष्काराचे जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनचे आवाहन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने क्रांतिदिनी भारतमाता जयच्या घोषात नागरिकांना राख्या बांधून चिनी मालावर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले. स्वदेशी वस्तूंचा स्वीकार करण्याची शपथही नागरिकांना देण्यात आली. 
 
सावेडी येथील भिस्तबाग चौकापासून ते श्रीराम चौकापर्यंत राबवण्यात आलेल्या या मोहिमेत फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी पालवे, जगन्नाथ जावळे, भाऊसाहेब कर्पे, निवृत्ती भाबड, दिगंबर शेळके, गणेश पालवे, संभाजी वांढेकर, भीमराज आव्हाड, साईनाथ घोरपडे, राहुल पाटील, राजू अनमल, रघुनाथ औटी, पप्पू आव्हाड, संकेत डोळे, अक्षय पोटे, अमोल आंधळे, अर्जुन कदम, संजय शिवचरण, विशाल पालवे, यादवराव आव्हाड, संदीप जावळे, मच्छिंद्र पालवे, बकुल पालवे आदि सहभागी झाले होते. 
 
युध्दाची भाषा करणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी त्यांच्या मालावर बहिष्कार टाकण्याची गरज आहे. भारत ही सर्वात मोठी बाजारपेठ असून चिनी मालावर पुर्णत: बहिष्कार टाकल्यास चीनची अर्थव्यवस्था कोळमडणार आहे. तर परदेशी वस्तूंपेक्षा स्वदेशी वस्तू खरेदी केल्यास भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट होणार असल्याची अपेक्षा माजी सैनिकांनी व्यक्त केली. 
बातम्या आणखी आहेत...