आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayabhim Housing Society Issue At Nagar, Divya Marathi

‘जयभीम’च्या परवाना निलंबनाची कारवाई नियमानुसारच झाली - पुरवठा विभागाचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केडगाव येथील जयभीम सहकारी भाडेकरू गृहनिर्माण संस्थेचा किरकोळ केरोसिन विक्रीचा परवाना निलंबित करण्याची कारवाई नियमानुसारच झाल्याचे स्पष्टीकरण पुरवठा विभागाने दिले आहे. जिल्हा पुरवठा अधिका-यांसमोर झालेल्या सुनावणीनंतर आढळलेल्या त्रुटींनुसार ही कारवाई करण्यात आली.
जयभीम गृहनिर्माण संस्था वर्षभरापूर्वी निष्प्रभावित झाली. संस्थेवर प्रशासक नियुक्त झाला आहे. संस्थेचा उद्देश घरबांधणी हा आहे. तथापि, संस्थेकडे स्वस्त धान्य व किरकोळ केरोसिन विक्री दुकाने असल्याचे निदर्शनास आले. ही दुकाने संस्थेने चालवणे आवश्यक असताना ती भाड्याने दिल्याचे स्पष्ट झाले. संबंधित दुकानांना धान्य व रॉकेल वितरणासाठी देऊ नये, असे प्रशासकाने अन्नधान्य वितरण अधिका-याला वर्षभरापूर्वीच कळवले होते. श्रेणी एकचे सहकार अधिकारी एस. व्ही. सुरम प्रशासक असताना त्यांनी ही माहिती पुरवठा विभागाला कळवून कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
संस्थेने नोकरनामा न करता करारनामा करून दुकाने चालवण्यास दिल्याचे उघड झाले. दुकाने चालवण्यासाठी संस्थेकडे भांडवल नाही. पर्यायाने सेल्समनचे भांडवल वापरले जाते. गैरप्रकारांबाबत संस्थेऐवजी सेल्समनला जबाबदार धरण्याचे करारनामे संस्था व सेल्समन यांच्यात झाले आहेत. मागणी करूनही संस्थेने उपविधी व इतर कागदपत्रे उपलब्ध केली नाहीत. अशा विविध कारणांवरून परवाना निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी दिले आहेत.
संस्थेकडे तीन स्वस्त धान्य दुकाने व दोन किरकोळ केरोसिन विक्री दुकानांचे परवाने आहेत. पुरवठा विभागाने या सर्व दुकानांचे ग्राहक इतर दुकांनाना जोडण्याची कार्यवाही केली आहे.