आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्रामविकासमंत्री जयंत पाटील दलित व मुस्लिमांचे शत्रू : कोळसे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दारिद्रय़रेषेची यादी अद्ययावत ठेवण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी पाळला नाही. त्याचा मोठा फटका दलित व मुस्लिम समाजाला बसला आहे. ही यादी अद्ययावत नसल्याने इंदिरा आवास योजनेतील 53 हजार घरकुलांमध्ये केंद्राने कपात केली. पाटील हे दलित, मुस्लिमांचे शत्रू आहेत, असे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे यांनी म्हटले आहे.

दारिद्रय़रेषेचा सव्र्हे चुकीचा झाल्यामुळे राबवण्यात येणार्‍या योजनांपासून लाभार्थी वंचित राहिल्याने सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी 2006 मध्ये महत्त्वपूर्ण निकाल दिला. दारिद्रय़रेषेच्या यादीत पात्र कुटुंबांचा समावेश व अपात्र कुटुंबांना वगळण्याची प्रक्रिया निरंतर सुरू ठेवण्याचे स्पष्ट करण्यात आले होते. यादीत समावेश होण्यासाठी अर्ज केल्यानंतर 10 दिवसांच्या आत अर्जदाराला तो पात्र किंवा अपात्र कळवणे बंधनकारक आहे, असे कोळसे यांनी पत्रकात म्हटले आहे.