आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayant Sasane Comment On Loss Of Election In Maharashtra

पराभवाबाबत चिंतनासाठी काँग्रेसचे लवकरच शिबिर - जयंत ससाणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व पदाधिकारी दोन दिवसांच्या शिबिरात चिंतन करणार आहेत. लवकरच या शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी मंगळवारी दिली.

जिल्हा काँग्रेस समितीत झालेल्या पक्षाच्या पदाधिकारी व तालुकाध्यक्षांच्या बैठकीत ससाणे बोलत होते. पक्षाच्या केंद्र-राज्य योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष विनायक देशमुख, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अण्णा शेलार, अर्थ व बांधकाम समितीचे सभापती बाळासाहेब दिघे, समाजकल्याण समितीच्या सभापती मीरा चकोर, राजेंद्र नागवडे, उबेद शेख, निखिल वारे, बाळासाहेब पवार, सविता मोरे, हेमंत आेगले, सोन्याबापू वाकचौरे, सचिन गुजर, डॉ. भास्कर शिरोळे, अॅड. अण्णा अंबाडे, मिठूभाई शेख, बाळासाहेब साळुंके, बाळासाहेब भुजबळ, अॅड. आर. आर. पिल्ले आदी यावेळी उपस्थित होते.

ससाणे म्हणाले, पक्षाच्या वतीने जिल्ह्यात हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे, आमदार बाळासाहेब थोरात यांच्यासह दोनशे निवडक कार्यकर्त्यांचे शिबिर घेण्यात येईल. बऱ्याच दिवसांनी जिल्हा परिषदेत पक्षाकडे तीन पदे आली
आहेत. या पदाधिकाऱ्यांनी दर मंगळवारी पक्षाच्या कार्यालयात बसून जनतेची कामे करावीत. काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाल्याबद्दल राधाकृष्ण विखे यांच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला.