आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हासहकारी बँकेच्या अध्यक्ष-उपाध्यक्षांची २२ ला निवड, दोन्ही गटांच्या हालचालींना वेग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हासहकारी बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी २२ मे रोजी दुपारी एक वाजता नवनिर्वाचित संचालकांची सभा घेण्यात येणार आहे. जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होईल. पदाधिकारी निवडीचा मुहूर्त जाहीर होताच विखे थोरात गटातील हालचालींना वेग आला आहे.

जिल्हा बँकेच्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी यांच्या गटाला ११ जागा मिळवण्यात यश आले. निसटत्या बहुमताच्या बळावर थोरात गट सत्ता राखण्यात यशस्वी होतो की, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे भाजप गट सत्ता हिसकावतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मे रोजी निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पदाधिकारी निवडीच्या मुहूर्ताची प्रतीक्षा करण्यात येत होती. सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणाऱ्या प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने गुरुवारी पदाधिकारी निवडीची तारिख जाहीर केली. २२ मे रोजी दुपारी एक वाजता जिल्हा बँकेतील मारुतराव घुले सभागृहात पदाधिकारी निवडीसाठी नवनिर्वाचित संचालकांची सभा बोलावण्यात आली आहे.

भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी चमत्कार घडवू, असे आव्हान देत फोडाफोडीच्या राजकारणाचे संकेत दिले होते. विखे यांनीही त्यांच्या विधानाला पृष्टी करणारे संकेत दिले होते. राजीव राजळे हे विखे गटाबरोबरच राहतील, असे कर्डिले यांनी सांगितले होते. भाजपने त्यांचे राजकारण जिवंत ठेवल्याचे सांगत राजळेंना विखे गटाची साथ द्यावीच लागेल, अशा सुरात कर्डिले यांनी इशारा दिला होता. पलटवार करताना राजळेंनी कर्डिले यांच्या विधानातील हवाच काढून घेतली असून विखे गटाच्या धडपडीला सुरुंग लावला.

गडाख, घुले, गायकर?
राष्ट्रवादीकडूनयशवंतराव गडाख, चंद्रशेखर घुले, सीताराम गायकर यांच्यात अध्यक्षपदासाठी चुरस आहे. गडाख घुलेंकडे सध्या आमदारकी नसल्याने बँकेचे पद त्यांच्याकडे देण्यासाठी दबाव आहे. पिचड यांनी गायकर किंवा वैभव पिचड असा पर्याय सूचवला आहे. थोरात राष्ट्रवादी गटाच्या बैठकीतून यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जातील.

बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे
सर्वांनासंधी देण्यासाठी दरवर्षी अध्यक्ष, उपाध्यक्ष बदलण्याचा पायंडा बँकेत पडला आहे. पाच वर्षांसाठी पदाधिकारी निवडण्यात आले, तरी एका वर्षातच पुन्हा नवीन पदाधिकारी निवडण्यात येतील. राष्टरवादीकडे सात संचालकांचे बळ असल्याने किमान पहिल्या वर्षी अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहील. चार संचालकांचे बळ असलेल्या थोरात गटाच्या पदरात उपाध्यक्षपद असा फॉर्म्युला ठरल्याचे सांगण्यात येत आहे. नाराजांना शांत करून बरोबर घेण्याचे मोठे आव्हान थोरात गटाला पदाधिकारी निवडीपर्यंत पार पाडावे लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...