आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Jitendra Awhad News In Marathi, Nationalist Congress, Nagar, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दलितांवर हल्ले होऊनही आठवले गप्पच,जितेंद्र आव्हाड यांची टीका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - खासदार भाऊसाहेब वाकचौरेंसारख्या दलित कार्यकर्त्याला मारहाण होते. दलितांवर राजरोस हल्ले होऊनही खासदार रामदास आठवले गप्प आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केली.नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार राजीव राजळे यांच्या प्रचारार्थ विठोबाराजे मंगल कार्यालयात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी आमदार बबनराव पाचपुते व चंद्रशेखर घुले, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, पक्षनिरीक्षक अंकुश काकडे, माजी आमदार अप्पासाहेब राजळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल लंघे, नगराध्यक्ष अभय आव्हाड, महिला आघाडीच्या मेधा कांबळे आदी उपस्थित होते.


तालुक्याचे राजकारण मराठा व वंजारी समाजाभोवती फिरते. वंजारी समाजाचे र्शद्धास्थान म्हणून असलेले भगवानगड पाथर्डी तालुक्यात असून गोपीनाथ मुंडे यांनी समाज बांधवांना गडावरूनच हाक देत संघटित केले. आव्हाड यांनीही भाषणातून स्वत:च्या जातीचा व संतांचा उल्लेख करत व समाजाचे र्शद्धास्थान असलेले मुंडे यांच्याविषयी सहानुभूती बाळगणारे भाषण केल्याने राष्ट्रवादीच्या आगामी रणनितीचा अंदाज आला. योगायोगाने भाजपचे जिल्हाध्यक्ष अँड. प्रताप ढाकणे यांनी दोन दिवसांपूर्वी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ढाकणे व मुंडे यांचे राजकीय विरोधक म्हणून भाजपचे उमेदवार दिलीप गांधी वाटावेत म्हणून त्यांचा एकेरी उल्लेख भाषणातून करत गांधींना एकटे पाडण्याचे काम आव्हाड यांनी केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भीमराव फुंदे यांनी केले. सूत्रसंचालन राजीव सुरवसे यांनी, तर आभार आमदार पाचपुते यांनी मानले. यावेळी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.