आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी क्षेत्रात नोकरीच्या मोठ्या संधी : खानदेशे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कृषी क्षेत्राचा अभ्यासक्रम व त्याची व्याप्ती वाढत असून, हे शिक्षण संशोधन व प्रात्यक्षिकांवर अवलंबून आहे. या क्षेत्रात विद्यार्थ्यांना नोकरीच्या मोठ्या संधी आहेत, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सचिव जी. डी. खानदेशे यांनी केले. गणराज प्रकाशनच्या सुधीर फडके लिखीत ‘एक कृषी विचार मंथन’ व ‘नर्मदा पुण्या सर्वदा’ या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात खानदेशे बोलत होते. कवी चंद्रकांत पालवे, नगरसेविका सुवर्णा जाधव, नगरसेवक अनिल शिंदे, ज्येष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष के. डी. खानदेशे, प्रकाशक गणेश भगत, लेखक सुधीर फडके आदी यावेळी उपस्थित होते.
खानदेशे म्हणाले, सध्या कृषी क्षेत्राची व्याप्ती वाढते आहे. फडके यांनी कृषीविषयक सकस लिखाण केले आहे. हे लिखाण शेतक-यांसाठी मार्गदर्शक ठरेल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रोहिणी आढे यांनी केले, तर आभार प्रा. गणेश भगत यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी अनघा तुपे, प्रा. गणेश कांगुणे, शब्बीर शेख व ज्येष्ठ नागरिक संघाने परिश्रम घेतले.