आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jonty And 5 People Robber Gang Catch By Police, Divya Marathi

कुख्यात दरोडेखोर जॉन्टीसह 5 जणांची टोळी गजाआड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- गेल्या काही वर्षांपासून फरार असलेला कुख्यात दरोडेखोर अरुण ऊर्फ जॉन्टी दत्तात्रेय जाधव (मुसळवाडी, ता. राहुरी) याच्यासह पाचजणांच्या टोळीला लोणी पोलिसांनी बुधवारी गजाआड केले. जॉन्टी हा हिस्ट्रीसीटर असून त्याच्याविरुद्ध दरोडा, जबरी चोरी, तसेच घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दरोड्याच्या दोन गुन्ह्यांमध्ये तो फरार होता.
जाधव आणि त्याचे साथीदार गौरव महेश मुनोत (दिल्लीगेट, नगर), बाळू दशरथ बर्डे (गांधेली, औरंगाबाद), मोतीलाल भालचंद गव्हाणे (बेगमपुरा, औरंगाबाद) व शरद किसन पंडोरे (बेगमपुरा, औरंगाबाद) हे बुधवारी राहाता तालुक्यातील कोल्हार येथील कुंकुलोळ कॉम्प्लेक्समध्ये आले असल्याची माहिती लोणीचे सहायक पोलिस निरीक्षक देविदास पवार यांना मिळाली होती. त्यांच्यासह पोलिस कर्मचारी राजेंद्र दरंदले, साहेबराव चव्हाण, किरण शेलार, सोमनाथ जायभाये यांनी सापळा रचून या आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्या ताब्यातून एअरगन, लोखंडी कटावणी, लाकडी दांडे, मिरची पावडर व बॅटरी जप्त करण्यात आली. आरोपींकडून इतर गुन्ह्यांची कबुली मिळण्याची शक्यता आहे. सहायक निरीक्षक पवार तपास करत आहेत.