आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनयभंगप्रकरणी पत्रकार भंडारे यांना पोलिस कोठडी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- विनयभंग व जातीवाचक शिवीगाळप्रकरणी पत्रकार प्रकाश भंडारे यांना मुख्य न्यायदंडाधिकारी ए. एम. राजकारणे यांनी सोमवारी 4 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सफाई कामगार महिलेचा विनयभंग करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी भंडारे यांच्याविरूद्ध रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राजकारणे यांच्यासमोर हजर करण्यात आले. तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक श्याम घुगे व सरकारी वकील रजनी देशपांडे यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला.