आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Journalist Protection Act Soon Says Prithviraj Chavan

‘पत्रकारांना सरंक्षण देणारा कायदा करणार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पत्रकार हल्लाविरोधी कायदा व्हावा, या मागणीसाठी कृती समितीतर्फे बुधवारी मुंबईत आंदोलन करण्यात आले. यामध्ये सहभागी होण्यासाठी नगरमधूनही पत्रकार गेले होते. हा कायदा लवकरात लवकर करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्न करेल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या वेळी आंदोलक पत्रकारांना दिले.

पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीचे निमंत्रक एस. एम. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. बुधवारी सकाळी पनवेल ते मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर कार रॅली काढण्यात आली. त्यानंतर आझाद मैदानावर प्रथम गृहमंत्री आर. आर. पाटील आंदोलकांच्या रॅलीला सामोरे आले. ‘हा कायदा पत्रकारांचा मूलभूत हक्क असून तो त्यांना मिळालाच पाहिजे’, असे मत त्यांनी व्यक्त या वेळी केले. त्यानंतर पत्रकारांच्या एका शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

या आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून पत्रकार आले होते. नगरमधून अहमदनगर प्रेस क्लबचे प्रभारी अध्यक्ष मन्सूर शेख, पत्रकार हल्लाविरोधी कृतिसमितीच्या नगर शाखेचे समन्वयक संजीव दायमा, इकबाल शेख आदी पत्रकार मुंबईला गेले होते. त्यांनी आंदोलन आणि दोन्ही ठिकाणी झालेल्या चर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला. नगर प्रेस क्लबने पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची मागणी केली .