आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या दीड टक्का पुरुषांकडून नसबंदी, महिलांकडूनच मिळतो प्रतिसाद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया पुरुष महिला दोघांनाही करता येते, पण जिल्ह्यातील आकडेवारीवरून महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत अग्रेसर असल्याचे समोर आले आहे. यंदा पुरुषांनी उद्दिष्टाच्या तुलनेत अवघ्या १.६ टक्केच पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
वाढत्या महागाईत अपत्य एक किंवा दोन यापेक्षा जास्त नकोच, अशी भूमिका आता आधुनिक दाम्पत्यांनी घेतली आहे. यापूर्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी मोठी जनजागृती करावी लागली. लोकसंख्या वाढीचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारकडून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी विशेष कार्यक्रम राबवला जातो. यात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग तसेच जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयांतही कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी उद्दिष्ट निश्चित केले जाते.

कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया पुरुष किंवा महिला या दोघांपैकी एकाने केली, तरी पाळणा थांबवता येतो. पण पाळणा थांबवण्यासाठी इतरही उपाय केले जातात, परंतु कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया कायमस्वरुपी पाळणा थांबवण्यासाठी केली जाते. कुटुंबाच्या तसेच सामाजिक दबावामुळे महिलाच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात यंदा ४८ टक्के कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यापैकी अवघे १.६ टक्के प्रमाण हे पुरुषांनी केलेल्या शस्त्रक्रियेचे आहे. पुरुष नसबंदीसंदर्भात अनेक गैरसमज असल्याने पुरुष कुटुंब नियोजनासाठी धजावत नाहीत. जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग दरवर्षी कुटूंब नियोजन शस्त्रक्रियेसाठीचे उद्दिष्ट घेऊन काम करतो. हे उद्दिष्ट पूर्ण करताना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयांनाही शस्त्रक्रियेसाठी उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार दोन अपत्यांवर केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया तसेच तांबी बसवून उपाय योजना केल्याचा स्वतंत्र अहवाल आरोग्य विभाग दरमहा तयार करते. मार्च २०१७ पर्यंत आरोग्य विभागाला ५२ टक्के कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. नियोजित वेळेत शस्त्रक्रियेची उद्दिष्टपूर्ती होईल, असा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
कुटुंबनियोजनची आकडेवारी
३२
पुरुषनसबंदी
७६५५
महिला
४३१५
बिनटाका
१४७८३
तांबीबसवणे

३२ पुरुषांचा समावेश
शासनानेनगर जिल्ह्यासाठी आरोग्य विभागाला हजार ५७ पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट दिले आहे. आतापर्यंत केवळ ३२ पुरुषांनीच नसबंदी शस्त्रक्रिया केली. उर्वरीत उद्दिष्ट मार्च २०१७ पर्यंत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

पुरुष नसबंदी सोपी शस्त्रक्रिया
^एककिंवादोन अपत्यांनंतर पाळणा कायमस्वरूपी थांबवण्यासाठी नसबंदी शस्त्रक्रिया केली जाते. यामध्ये शुक्रपेशी वीर्यात जाण्याचा मार्ग बंद होतो. ही शस्त्रक्रिया केवळ पाच-दहा मिनिटांत होते. रक्तस्राव, जखम, सूज येण्याचा त्रास कमी असतो. पण सात ते आठ दिवस लंगोट वापरणे, ओझे उचलणे ही पथ्ये पाळणे आवश्यक असते.'
' डॉ.अतुल झंवर, फॅमिली फिजिशियन, वांबोरी.
बातम्या आणखी आहेत...