आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्याय भवनाचा प्रश्न सुटला, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या पाठपुराव्याला यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सावेडी उपनगरात सुमारे १४ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा प्रश्न अखेर सुटला. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी न्याय भवनासाठी वेळोवेळी पाठपुरावा केला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर या कामासाठी सुमारे आठ कोटी रुपयांची तांित्रक निविदा प्रसिद्ध केली आहे. येत्या दीड वर्षात हे न्याय भवन उभारण्यात येणार असल्याचे आश्वासन बांधकाम विभागाने दिले आहे.
प्रत्येक जिल्ह्यात सामाजिक न्याय भवन उभारण्याचा निर्णय आघाडी सरकारने घेतला होता. त्यानुसार राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये सामाजिक न्याय भवन उभारण्यात आले. नगर जिल्ह्यात मात्र न्याय भवन उभारण्यासाठी अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष बनसोडे यांनी या कामासाठी पाठपुरावा केला. सार्वजिक बांधकाम विभागाकडून मात्र टोलवाटोलवी करण्यात येत होती. त्यामुळे बनसोडे यांनी बांधकाम विभागाच्या विरोधात अनेक वेळा आंदोलने केली. १५ दिवसांपूर्वी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाने केलेल्या आंदोलनाची बांधकाम विभागाने दखल घेतली. या विभागाने उच्चस्तरावर हालचाली करत ३० नोव्हेंबरला सामाजिक न्याय भवनाच्या कामासाठी सुमारे आठ कोटी रुपयांची तांत्रिक निविदा प्रसिध्द केली. येत्या दीड वर्षात न्याय भवनचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन बांधकाम विभागाने दिले आहे. न्याय भवनासाठी सुमारे १४ कोटींचे अंदाजपत्रक तयार केले आहे. त्यात आठ कोटींचे बांधकाम, ५५ लाखांची विद्युतीकरणाची कामे, पाणी मलनि:सारणासाठी २५ लाख, संरक्षक भिंतीसाठी ३९ लाख, अंतर्गत रस्त्यांसाठी ५० लाख, फर्निचरसाठी एक कोटी ७५ लाख अशा कामांसाठी तरतूद करण्यात आली आहे. उद्यान, पार्कींग, रेन वॉटर हार्वेस्टिंग, अग्निशमन यंत्रणा असे विविध सुविधा सामाजिक भवन परिसरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
दीड वर्षात काम पूर्ण करणार
सावेडी उपनगरात उभारण्यात येणाऱ्या न्याय भवनाचे काम दीड वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. तसे लेखी पत्र बांधकाम विभागाने बनसोडे यांना दिले आहे. निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून लवकरच प्रत्यक्षात काम सुरू होणार असल्याचे बांधकाम विभागाने सांगितले. यावेळी बनसोडे यांच्यासह नीलेश बांगरे, वैभव जाधव, समीर बागवान आदी उपस्थित होते.

पाठपुरावा सुरूच राहील
^डॉ.आंबेडकर सामाजिक न्याय भवनासाठी वेळोवेळी आंदोलने करावी लागली. बांधकाम विभागाने मागणीची दखल घेत निविदा प्रसिद्ध केली. बांधकाम विभागाने तातडीने या कामाची कार्यवाही पूर्ण करावी, दिलेल्या मुदतीत न्याय भवन उभे राहावे. त्यासाठी पाठपुरावा सुरू राहील.'' सुरेशबनसोडे, शहर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी सामाजिक न्याय भवन.
बातम्या आणखी आहेत...