आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kalasubai Mata Temple,Latest New In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कळसूबाईचे शिखर उजळले विद्युतदीपांनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले- राजकीय जीवनात वाटचाल करताना मी माझ्या प्रचाराचा प्रारंभ नेहमीच कळसूबाई शिखराला अभिवादन करून व कळसूआईला श्रीफळ वाढवून केला. आजपर्यंत कळसूआईने मला सलग सात वेळा निवडून दिले. कळसूबाई मातेच्या चरणावर प्रकाश पडल्यामुळे मला कर्तव्यपूर्तीचा आनंद मिळाला, असे भावनिक उद्गार पालकमंत्री मधुकर पिचड यांनी शुक्रवारी काढले.महाराष्‍ट्रातील सर्वांत उंच असलेल्या कळसूबाई शिखरावर आदिवासी उपयोजनेच्या सुमारे एक कोटी रुपयांचा निधीतून वीज पोहोचली.
या विद्युतीकरणाचे उद्घाटन शुक्रवारी (20 जून) सायंकाळी सात वाजता मंत्री पिचड यांच्या हस्ते बारी येथे करण्यात आले. यावेळी वैभव पिचड, अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, मीनानाथ पांडे, राजूरच्या सरपंच हेमलता पिचड, महावितरणचे अधीक्षक अभियंता दत्तात्रय कोळी, मुख्य अभियंता ए. डी. नालकर, जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती कैलास वाकचौरे, अकोले पंचायत समितीच्या सभापती अंजना बोंबले, जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे आदी उपस्थित होते.

गिर्यारोहकांची व्यवस्था
शिखरावरून भंडारदरा धरणातील पाण्याने व्यापलेला विस्तीर्ण भाग पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. शिखराच्या उत्तरेला रामसेज, हरिहरगड, ब्रह्मगिरी, अंजनगिरी, घरगड, बहुला, त्रिंगलवाडी, कवनाई हे गड आहेत. पूर्वेला उंडा, विश्रामगड, बितनगड, पश्चिमेला अलंग, मदनगड, रतनगड, दक्षिणेला पाभरगड, घनचक्कर, हरिश्चंद्रगड दिसतात. शिखरावर दिवे लावण्याची व्यवस्था झाल्यामुळे पर्यटक, गिर्यारोहकांची सोय झाली आहे.
पर्यटनवाढीस चालना

कळसूबाई शिखरावर वीज नेण्याचे काम तीन महिन्यांत पूर्ण झाले. 11 केव्ही दाबाची सुमारे सहा किलोमीटर लांबीची भूमिगत वाहिनी टाकण्यात आली. त्यामुळे पर्यटनवाढीस चालना मिळून स्थानिकांना कामे मिळतील. गडावर जाण्यासाठी रोपवेच्या कामास यापुढे गती मिळेल. आदिवासी योजनेच्या निधीतून व्यवसाय वृद्धीसाठी आदिवासी तरुणांना संधी मिळेल. पर्यटक व भक्तनिवासाची उभारणी केली जाईल, असेही पिचड यावेळी म्हणाले.