आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kanhura Organization And Frood Issue At Nagar, Divya Marathi

कान्हूर संस्था वाचवण्यासाठी गैरव्यवहारांचा पर्दाफाश, आझाद ठुबेचे विरोधकांना प्रत्युत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - 1984 मध्ये माझे वडील बाबासाहेब ठुबे यांनी कान्हूर पठार पतसंस्था स्थापन केली. त्यामुळे ती बुडावी, अशी आमची इच्छा नाही. याचा अर्थ पतसंस्थेमधील गैरव्यवहारांबद्दल काही बोलायचे नाही, असा होत नाही. आमचा उद्देश ती बुडवण्याचा नसून वाचवण्याचा आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य आझाद ठुबे यांनी गुरुवारी केले.

कान्हूर पठार पतसंस्थेच्या गैरव्यवहारांबाबत ठुबे यांनी आघाडी उघडल्यावर त्यांच्यावर ते पतसंस्था चळवळीला हानी पोहोचवत असल्याची टीका काहींनी सुरू केली होती. तिला उत्तर देण्यासाठी आझाद ठुबे यांनी गावात सभा घेतली. या सभेत त्यांनी टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले.

ते म्हणाले, पतसंस्था चालवताना माझा वापर करून व्यवस्थापकाने ज्ञानदेव वाफारेंना बाहेर काढले. नंतर आम्हालाही अशाच पद्धतीने पतसंस्थेच्या बाहेर काढून व मोठ्या संख्येने नातेवाईकांना संचालक बनवून पतसंस्था ताब्यात घेतली व मनमानी पद्धतीने कारभार सुरू केला. तालुक्यातील व जिल्ह्यातील
बुडालेल्या पतसंस्थांबाबतीत जागरूक सभासदांनी वेळीच लक्ष घातले असते, तर त्याही वाचवता आल्या असत्या, या भूमिकेतूनच आम्ही कान्हूर पठार पतसंस्थेच्या कारभाराबाबत मागण्या केल्या आहेत. आमच्या मागण्या पतसंस्था चळवळ बुडवण्यासाठी नसून ती वाचवण्यासाठी आहेत, असे त्यांनी नमूद केले.

कान्हूर पठार पतसंस्थेच्या कर्मचा-यांनी राजे शिवाजी पतसंस्थेसमोर उपोषण केले, पण आम्ही या कर्मचा-यांच्या विरोधात नाही. या कर्मचा-यांचा कळवळा असणा-यांनी अनेक कर्मचा-यांना केवळ तोंडी आदेश देऊन व कोणतीही नोटीस न देता काढून टाकले आहे. त्यावेळी त्यांचा हा कळवळा कोठे गला होता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

राजकीय हेतूने ग्रामविकासात अडथळे आणणा-यांवर टीकास्र सोडताना ते म्हणाले, गेल्या दोन वर्षांपासून सरपंच व ग्रामसेवकांच्या चौकशा करून कान्हूर पठार गावाला बदनाम करण्याचे काम कान्हूर पठार पतसंस्थेच्या अध्यक्षांनी केले. गावाच्या विकासासाठी मोठा निधी आला आहे, पण माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करून सारखे अर्ज करणा-यांमुळे अधिकारी गावात काम करायला तयार नाहीत. गावात अशांतता निर्माण होऊ नये, म्हणून इतके दिवस आम्ही गप्प बसलो. याचा अर्थ आम्ही कमजोर आहोत, असा कोणी घेऊन नये. माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देणे, माहितीच्या अधिकाराचा गैरवापर करणे त्यांनी थांबवले नाही, तर जशास तसे उत्तर देण्याचा इशारा त्यांनी दिला.
सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षक नेते द. मा. ठुबे होते. यावेळी आझाद ठुबे यांच्या मातोश्री नंदादेवी ठुबे, सरपंच संगीता सदानंद सोनावळे, उपसरपंच गोकुळ काकडे, ग्रामपंचायत सदस्य लता ठुबे, किरण ठुबे, सागर व्यवहारे, नियाज इनामदार, राजे शिवाजी पतसंस्थेचे उपाध्यक्ष शमसूद्दिन इनामदार, अण्णासाहेब सोनावळे, बाळासाहेब ठुबे, संतोष ठुबे, भास्कर पोपळघट यांच्यासह ग्रामस्थ व महिला मोठ्या उपस्थित होत्या. यावेळी द. मा. ठुबे, माजी उपसरपंच शिवाजी शेळके, सैनिक
चौकशीच्या मागण्यांच्या केला पुनरुच्चार...
कान्हूर पठार पतसंस्थेच्या कारभाराच्या, तसेच अध्यक्ष व कार्यकारी संचालकांच्या संपत्तीच्या चौकशीच्या मागणीबरोबरच संस्था मल्टिस्टेट करताना सभासदांच्या अर्जाच्या नकला, मल्टिस्टेट करताना आलेला खर्च जाहीर करावा, राज्याबाहेरील सभासदांची यादी मिळावी, मागील पाच वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल मिळावेत आदी मागण्यांचा आझाद ठुबे यांनी पुनरुच्चार केला.