आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Karmaveer Bhaurao Patil,latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कर्मवीर भाऊरावांचे चरित्र प्रत्येकाने वाचावे: कळमकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कर्मवीर भाऊराव पाटील यांचे चरित्र महाराष्ट्रातील प्रत्येकाने वाचावे, असे आवाहन रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दादा कळमकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या ल. भा. पाटील विद्यालयात कर्मवीर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी लक्ष्मण वाडेकर होते. जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी अशोक कडूस, टी. पी. कन्हेरकर, ज्ञानदेव पांडुळे, बी. बी. लांगोरे, कैलास मोहिते, प्रभाकर खणकर, गोपीनाथ सोनवणे, कुतुबुद्दीन शेख आदी यावेळी उपस्थित होते.
कळमकर म्हणाले, कर्मवीर भाऊराव पाटील ही सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अखंड व धगधगती ज्योत होती. बहुजनांच्या झोपड्या ज्ञानदीपाने उजळण्याचे काम त्यांनी केले. त्यांचे जीवन केवळ विद्यार्थ्यांना नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणिक दळवी व नीलिमा कातोरे यांनी केले. आभार काकासाहेब वाळूंजकर यांनी मानले.