आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत सासणे, चंद्रकांत भोंजाळ उद्या नगरमध्ये, कविसंमेलन रंगणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सुप्रसिद्ध साहित्यिक भारत सासणे व भारतीय साहित्य अकादमी पुरस्कारविजेते मूळचे नगरचे लेखक चंद्रकांत भोंजाळ यांच्या उपस्थितीत रविवारी (३१ ऑगस्ट) कवयित्री संजीवनी खोजे पुरस्काराचे वितरण होणार आहे. टिळक रस्त्यावरील तुषार गार्डनमध्ये सायंकाळी साडेचार वाजता हा कार्यक्रम सुरू होईल.
यंदाचा खोजे पुरस्कार अभय दाणी यांच्या "एरवी हा जाळ' या काव्यसंग्रहास जाहीर झाला आहे. तीन हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे हे २४ वे वर्ष आहे. यापूर्वी आसावरी काकडे, पोपट सातपुते, अशोक नायगावकर, खलील मोमीन, नीरजा, लोकनाथ यशवंत, लहू कानडे, संजीवनी बोकील, प्रवीण बांदेकर, राम दोतोंडे, श्रीकृष्ण राऊत, नारायण सुमंत, सतीश सोळांकूरकर, संतोष पवार, संजय चौधरी, प्रा. धम्मपाल रत्नाकर, अनुराधा नेरूरकर, डॉ. केशव सखाराम देशमुख, प्रा. संदीप जगताप, प्रा. शंकरराव दिघे, पी. विठ्ठल, प्रवीण दवणे, प्रा. डॉ. चं. वि. जोशी यांना खोजे काव्य पुरस्कार देण्यात आला आहे.
कविसंमेलन रंगणार
पुरस्कार वितरणानंतर मान्यवर कवी कविता सादर करतील. प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या काव्य स्पर्धेचे पारितोषिक वितरणही यावेळी करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वँंासाठी खुला असून रसिकांनी यावेळी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष शशिकांत मुथा व रामदास फुटाणे यांनी केले आहे.