आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कावीळ साथप्रकरणी पोलिस चौकशी करा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शहरातपसरलेल्या कावीळ साथप्रकरणाची पोलिस चौकशी करावी, असे आदेश जिल्हा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी बी. ए. गायकवाड यांनी गुरुवारी दिले. "दिव्य मराठी'ने सुरुवातीपासून कावीळप्रश्नी पाठपुरावा केला. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते दिगंबर गेंट्याल यांनी काविळीची साथ पसरण्यास जबाबदार असलेल्या का अधिकाऱ्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी याचिका न्यायालयात दाखल केली होती. दरम्यान, राज्याच्या शीघ्र पथकाने देखील कावीळप्रकरणी मनपावर ठपका ठेवलेला आहे.

शहरातील आगरकर मळा परसिरात काविळीची लागण झाल्याचे १२ ऑगस्टला निदर्शनास आले. त्यावर मनपा प्रशासनाने कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे कावीळ रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. त्यात अशोक दराडे गोरख घेवरे या दोन नागरिकांचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती मनपाने राज्य कार्यालयास कळवली नाही, वृत्तपत्रांच्या माध्यमातून ही माहिती मिळाल्यानंतर राज्य शीघ्र पथकाने सप्टेंबरला काविळीची लागण झालेल्या भागाची पाहणी केली. मनपा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळेच काविळीची साथ पसरली असल्याचा ठपका या पथकाने ठेवला. दरम्यान, काविळीची साथ पसरण्यास दोघांच्या मृत्यूस जबाबदार असलेले *का आयुक्त विजय कुलकर्णी, आरोग्याधिकारी डॉ. सतीश राजूरकर पाणीपुरवठा विभागप्रमुख परिमल निकम यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशा मागणीची याचिका सामाजिक कार्यकर्ते गेंट्याल यांनी न्यायालयात दाखल केली होती. यासंदर्भात पोलिस चौकशी करून पुढील कार्यवाही करावी, असे आदेश न्यायालयाने गुरुवारी दिले. या आदेशामुळे *केचे हे तिन्ही जबाबदार अधिकारी अडचणीत आले आहेत.

शहरातील हजारो नागरिकांना कावीळ झाली, तरी *केकडून कोणतीच ठोस उपाययोजना झाली नाही. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच दोन नागरिकांचा बळी गेला. याप्रकरणी दोषी अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत, अशी समाजहिताची भावना डोळ्यासमोर ठेवूनच न्यायालयात याचिका दाखल केली होती.'' दिगंबरगेंट्याल, याचिकाकर्ते.

कावीळ साथप्रकरणी "दिव्य मराठी' ने वेळोवेळी पाठपुरावा केला.
मनपा प्रशासनाने पाळलेल्या सूचना
*खासगीव्यावसायिकांची प्रभागनिहाय यादी करावी
*रुग्णांच्या मोफत उपचारासाठी सक्षम यंत्रणा
*प्रत्येक भागात काविळीसाठी ओपीडी सुरू करावी
*शहरातील ट्रस्ट रुग्णालयांच्या १० टक्के खाटा राखी
*जनतेच्या सुविधेसाठी कॉल सेंटर सुरू करणे
*बस रेल्वेस्थानकावर लाऊडस्पिकरने प्रबोधन
*खासगी डॉक्टरांचे प्रबोधन
*शहरातील वसतिगृह शाळांचे सर्वेक्षण
*लोकसहभागातून स्वच्छता अभियान