आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काविळीची साथ : मृतांच्या नातेवाईकांना दहा लाख द्या - आमदार राठोड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दुषित पाणीपुरवठ्यामुळे शहरातील विविध भागातील शेकडो नागरिकांना कािवळीची लागण झाली आहे. दोघांचा मृत्यू होऊनही महापािलका प्रशासनाला या साथीचे गांभीर्य समजलेले नाही. कोणत्याही ठोस उपाययोजना न करता केवळ रुग्णांची संख्या मोजण्यातच (खोटी आकडेवारी) प्रशासनाने धन्यता मानली आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी ती अिधक वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कािवळीमुळे मरण पावलेल्या दोघांच्या नातेवाईकांना महापािलकेने प्रत्येकी दहा लाख, तर लागण झालेल्या रुग्णांना ५० हजार रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी आमदार अिनल राठोड यांनी गुरूवारी केली.
महापािलकेच्या बेजबाबदार कारभारामुळेच शहरात कािवळीची साथ पसरली आहे. नगरच्या इितहासात अशी गंभीर घटना कधी घडली नव्हती. मनपातील सत्ताधारी व प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे शहरावर हा दुर्दैवी प्रसंग ओढवला आहे, अशा शब्दांत आमदार राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन महापािलकेच्या कारभारावर टीका केली. यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अिनल शिंदे, विक्रम राठोड आदी उपस्थित होते.
राठोड म्हणाले, कािवळीमुळे मृत्यू झालेल्या दोघांच्या नातेवाईकांना महापािलका व राज्य शासनाने प्रत्येकी पाच लाख अशी एकूण दहा लाख रुपयांची मदत करावी, तसेच कािवळीची लागण झालेल्या रुग्णांना मनपाने ५० हजार रुपयांची मदत द्यावी. मनपा आयुक्त व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना तसे पत्र देणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.
शहराच्या ७५ टक्केे भागात सध्या दूिषत पाणीपुरवठा सुरू आहे. कुठे मैलािमश्रित, तर कुठे अळ्या असलेले पाणी नागरिकांना प्यावे लागत आहे. त्यामुळे सत्ताधारी व प्रशासनाच्या विरोधात नागरिकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. कािवळीची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, तरीदेखील प्रशासन काहीच ठोस उपाययोजना करत नाही. त्यामुळे महापािलका अिस्तत्वात आहे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. साथ रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना करा, अशा सूचना जिल्हािधकारी अिनल कवडे यांनी देऊनही मनपा प्रशासन जागचे हलले नाही. उलट आपली जबाबदारी झटकण्याचे काम अिधकारी करत आहेत. त्यांच्या हलगर्जीणामुळेच नागरिकांना कािवळीच्या साथीला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे अशा अिधकाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करणार असल्याचे राठोड यांनी सांगितले.
चुकीच्या ठेकेदाराला काम
महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी शहर सुधारीत पाणीपुरवठा योजनेचे काम चुकीच्या ठेकेदाराला दिले आहे. त्यामुळेच ते रखडले आहे. या कामावर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे ठेकेदार सध्या मनमानी पध्दतीने काम करत आहे. अंतर्गत जलवािहन्या समान पध्दतीने टाकण्यात आलेल्या नाहीत. योग्य ठेकेदाराला काम दिले असते, तर आतापर्यंत ही सुधारित पाणी योजना पूर्ण होऊन नागरिकांवर दूिषत पाणी पिण्याची वेळ आली नसती.''
भगवान फुलसौंदर, माजी महापौर
ठरावीक टाक्यांची स्वच्छता
साथ रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने ठरावीक टाक्यांची स्वच्छता केली. परंतु रुग्णांवर उपचारांसाठी ठोस उपाययोजना केली नाही. जिल्हा रुग्णालयातील एक वॉर्ड राखीव ठेवण्यात आला, परंतु तो पुरेसा नसल्याने खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घ्यावे लागतात. नक्की कितीजणांना लागण झाली, याबाबतही मनपाकडे ठाेस आकडेवारी नाही. खासगी रुग्णालयांच्या मािहतीच्या आधारावर ३२५ नागरिकांना कावीळ झाल्याचे प्रशासन सांगत आहे. मनपाचा एकही अिधकारी व कर्मचारी रुग्णांची मािहती घेण्यासाठी अजून घरोघरी पोहचलेला नाही.