आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kedagavace Characteristic Saimandira Place For The Devotees Rsaddha

केडगावचे वैशिष्ट्यपूर्ण साईमंदिर भाविकांचे र्शद्धास्थान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर-ज्या मोकळ्या जागेला वर्षापूर्वी वेड्याबाभळी, कचरा यामुळे गचाळ स्वरूप आले होते, त्याच जागेवर लोकसहभागातून साईबाबांचे मंदिर उभे राहिले आहे. साईभक्तांच्या सहभागातून अवघ्या सात महिन्यांत हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर पूर्ण झाले. हे मंदिर नगर शहर आणि परिसरातील भक्तांचे र्शद्धास्थान बनले आहे.

केडगाव उपनगरातील सहकार बँक कॉलनी परिसरात सुमारे 10 हजार चौरस फूट आकाराचा ओपन स्पेस आहे. वेड्याबाभळी असल्याने या जागेचा वापर कचरा टाकण्यासाठी केला जात होता. ही जागा स्वच्छ करून तेथे मुलांसाठी खेळणी बसवण्याचा निर्णय कॉलनीतील रहिवाशांनी घेतला. मैदान स्वच्छ झाल्यानंतर मंदिराची कल्पना पुढे आली. कोणते मंदिर बांधावे, याबाबत खल झाला. अखेर सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेले साई मंदिर उभारण्याचा निर्णय झाला. कॉलनीतील रहिवाशांची संख्या र्मयादित असल्याने अवघी दोन लाख वर्गणी जमा झाली. तथापि, राज रमेश सातपुते, शेखर मलिक पेटकर या साईभक्तांनी दिलेल्या देणगीमुळे 3 जानेवारी 13 रोजी बांधकाम सुरू झालेले हे मंदिर 22 ऑगस्टला पूर्ण झाले. बांधकाम भूषण ताकटे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले.

हे मंदिर अनेक वैशिष्ट्यांनी नटलेले आहे. मुख्य साईमूर्ती पाच फूट उंचीची असून शुभ्र मकराना मार्बलपासून बनवलेली आहे. मंदिराची उंची 60 फूट आहे. कळस चेन्नईहून आणला आहे. कळसाचा आकार मदुराईच्या मीनाक्षी मंदिराच्या कळसासारखा आहे. मंदिरातील झुंबर सिंगापूरवरून आणले आहेत. त्यातील दिवे लावताच अखंड साईनामाचा जप सुरू होतो. घंटा मलेशियातून आणली आहे. पितळ व इतरमिर्श धातूंपासून बनवलेल्या या घंटेवर लक्ष्मी, विष्णू, शंकर-पार्वती, गणपती, राम-लक्ष्मण-सीता, बाळकृष्ण, कालिकामाता, हनुमान यांच्या मूर्ती आहेत. मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्यावेळी शिर्डीच्या साई मंदिरातील पुजार्‍यांच्या हस्ते तीन दिवस विधिवत पूजा करण्यात आली. नगर शहरासह परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात.


शिर्डीप्रमाणेच होते दररोज पूजाअर्चा

शिर्डी येथील मंदिराप्रमाणेच येथे पूजाअर्चा होते. सकाळी सहा वाजता काकड आरती, साडेसातला आरती, दुपारी 12 वाजता माध्यान्ह आरती, सायंकाळी साडेसातची आरती आणि रात्री 10 वाजता शेजआरती होते. कॉलनीतील 30 कुटुंबांचे तारखेनुसार क्रम लावलेले आहेत. आरतीसह बाबांचे दोन वेळचे भोजन ताट व प्रसाद त्या त्या कुटुंबाकडून मंदिरात जातो.

अनेक देवतांच्या नावांची चर्चा झाली. अखेर सर्वधर्मसमभावाचे प्रतीक असलेल्या साईमंदिराला पसंती दिली. येथील रहिवासी एकत्र आले व एकजुटीची भावना कॉलनीत वाढीस लागली.’’ डॉ. मुकुंद शेवगावकर, अध्यक्ष, सहकार बँक. कॉलनी सोसायटी.