आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळजोडाची पठाणी वसुली बंद करा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - केडगाव पाणी योजनेंतर्गत (फेज १) नवीन जलवाहनि्यांवर नळजोड घेण्यासाठी नागरिकांकडून सक्तीने पैसे वसूल करण्यात येत आहे. ही पठाणी वसुली बंद करून नागरिकांना पैसे भरण्यासाठी दोन महनि्यांची मुदत द्या, अशी मागणी नगरसेवक दिलीप सातपुते यांनी सोमवारी आयुक्तांकडे केली. नागरिकांकडून सक्तीने नळजोडाचा खर्च वसूल करण्यात येत असल्याचे वृत्त "दवि्य मराठी'ने प्रसिध्द केले होते. त्याची दखल घेत सातपुते यांनी ही पठाणी वसुली बंद करण्याची मागणी केली.

केडगाव उपनगरात सुरू असलेल्या पाणी योजनेंतर्गत (फेज १) नवीन जलवाहनि्यांवर नळजोड स्थलांतर करण्याचे काम सध्या सुरू आहे. नागरिकांकडून नळजोडासाठी अव्वाच्या सव्वा पैसे सक्तीने वसूल करण्यात येत आहे. हा प्रकार "दवि्य मराठी'ने उघड केल्यानंतर नगरसेवक सातपुते यांनी प्रशासनाला जाब विचारला. मनपा कर्मचारी नळजोडाचे पैसे वसूल करण्यासाठी नागरिकांच्या दारात जाऊन बसत आहेत. पैसे भरल्यास पाणीपुरवठा बंद करण्याची धमकी ते देतात. या पठाणी वसुलीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचे सातपुते यांनी उपायुक्त अजय चारठाणकर यांच्या निदर्शनास आणून दिले.

जुलै महनि्यात नागरिकांमागे मुलांच्या शाळा, महाविद्यालय प्रवेशांचा खर्च आहे. केडगावातील नागरिक सर्वसामान्य नोकरदार असून नळजोडाच्या खर्चामुळे त्यांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे पठाणी वसुली बंद करून नागरिकांना पैसे भरण्यासाठी दोन महनि्यांची मुदत द्यावी, अशी मागणी सातपुते यांनी केली.

नळजोडाचे पैसे वसूल करण्याचे आदेश मनपा कर्मचा-यांना देण्यात आले आहेत. त्यात कामचुकारपणा केलेल्या काही कर्मचा-यांना उपायुक्त चारठाणकर यांनी कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. कारवाईच्या भीतीपोटी हे कर्मचारी नळजोडाचे पैसे वसूल करण्यासाठी नागरिकांच्या दारात जाऊन बसत आहेत. नळजोडाच्या कामासाठी येणारा कोटी ४७ लाख रुपयांचा खर्च केडगावकरांच्या माथी मारण्यात आला आहे. नागरिकांनी पन्नास टक्के खर्च रोख, तर उर्वरित पन्नास टक्के खर्च संकलित करातून भरण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. केडगावात हजार २०० नळजोडांची नोंदणी आहे. त्यात आणखी सुमारे हजार नळजोडांची भर पडेल, असा मनपाचा अंदाज आहे. आतापर्यंत अवघ्या ७० ते ८० नळजोडांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित नागरिक अजूनही पैसे भरण्यास तयार नाहीत. त्यामुळे योजनेचे अंतिम टप्प्यात आलेले काम आणखी काही महिने रखडण्याची शक्यता आहे. दरम्यान, नळजोड देण्यासाठी कोणत्या दर्जाचे साहित्य वापरण्यात येत आहे, कामाचा ठेकेदार कोण आहे, याची माहिती देण्यास महापालिकेचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे नागरिकांचा संभ्रम आणि संताप आणखी वाढला आहे.

७५ टक्के नागरिकांनी पैसे भरणे आवश्यक
नागरिकांकडूननळजोडाचे पैसे सक्तीने वसूल करण्यात येत नाहीत. योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या प्रत्येक उंच टाकी अंतर्गत येणा-या ७५ टक्के नागरिकांनी पैसे भरणे आवश्यक आहे. ७५ टक्के नागरिकांनी नळजोडाचे पैसे भरल्यानंतर त्यांना पाणीपुरवठा होईल. उर्वरित नागरिकांना पैसे भरण्यासाठी वेळ मिळेल.'' अजयचारठाणकर, उपायुक्त.

फेज टूशविाय पाणी नाही
शहरसुधारित पाणी योजनेचे (फेज टू) काम पूर्ण झाल्याशविाय केडगाव पाणी योजनेला पुरेसे पाणी मिळणार नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने नळजोडाच्या पैशांची सक्तीने वसुली करण्यासाठी फेज टू योजना कशी पूर्ण होईल, याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. केडगाव पाणी योजना पूर्ण झाली, तरी आहे त्या पाण्यातूनच नवीन नळजोड दिल्याने केडगावचा पाणीप्रश्न सुटण्यास फारशी मदत होणार नसल्याचे सातपुते यांनी नविेदनात म्हटले आहे.

मनपाची भूमिका चुकीची
दोनते तीन हजार रुपये खर्च करून नळजोड मिळेलच की नाही, त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य दर्जेदार असेल की नाही, घरापर्यंत नळजोड मिळेल की, पुन्हा वेगळा खर्च करावा लागेल, असे अनेक प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाले आहेत. मनपाने मात्र या प्रश्नांची उत्तरे देताच नागरिकांकडून सक्तीने नळजोडाचा खर्च वसूल करण्यास सुरुवात केली आहे. जोपर्यंत नागरिक नळजोडाचा ५० टक्के खर्च रोख स्वरूपात भरत नाहीत तोपर्यंत नळजोडाच्या कामास गती मिळणार नाही, अशी मनपाची भूमिका आहे.

नागरिकांसाठी योजना चांगलीच
केडगाव पाणी योजना नागरिकांसाठी चांगलीच आहे. परंतु ती कार्यान्वित करताना नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. नागरिक पैसे भरण्यास तयार आहेत. परंतु त्यांना थोडी मुदत द्यायला हवी. मनपा कर्मचारी पठाणी पद्धतीने पैशांची वसुली करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. याची दखल प्रशासनाने घेणे आवश्यक आहे.'' दिलीप सातपुते, नगरसेवक.