आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉकेलची सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर, संगमनेरमध्ये योजनेची अंमलबजावणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - रॉकेलसाठीची सबसिडी थेट शिधापत्रिकाधारकांच्या खात्यावर जमा करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी संगमनेरमध्ये सुरू झाली असून त्यासाठी गावागावांत राष्ट्रीयीकृत बँकेत मोफत खाते उघडण्याची मोहीम हाती घेतली आहे.

रॉकेलसाठी पात्र शिधापत्रिकाधारकांना महिला सदस्याच्या नावे राष्ट्रीयीकृत बँकेत बचत खाते आवश्यक आहे. या खात्यावर सबसिडी जमा केली जाणार आहे. संगमनेरमध्ये गावोगाव शिधापत्रिकाधारकांच्या नावाने बँकेत खाते उघडण्याची मोहीम तहसीलदार शरद घोरपडे यांनी हाती घेतली आहे. तालुक्यातील गावागावांत गावनिहाय बँका निश्चित करून त्यांच्या अधिकार्‍यांना ठरलेल्या दिवशी त्या गावात पाठवून ही खाती उघडण्यात येत आहेत. 31 जुलैअखेरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. कुटुंब प्रमुखाच्या नावाने, जर राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असेल, त्या खात्यावर पत्नीचे नाव समाविष्ट करून संयुक्तपणेही खाते उघडता येईल, जर पत्नी हयात नसेल, तर शिधापत्रिकेतील कुटुंबातील वरिष्ठ महिलेच्या नावाने हे खाते उघडावे लागणार आहे.

जनतेने सहकार्य करावे
शिधापत्रिकाधारकांनी गावात येणार्‍या राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकार्‍यांकडे घरातील महिला सदस्याच्या नावाने खाते उघडावे. या खात्यावर सबसिडीची रक्कम जमा होईल. या मोहिमेसाठी शिधापत्रिकाधारकांनी सहकार्य करावे.’’
शरद घोरपडे, तहसीलदार, संगमनेर.