आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉकेल अनुदानासाठी 4 लाख 94 हजार ग्राहकांची बँकेत खाती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - राज्य सरकारकडून रॉकेलचे अनुदान थेट ग्राहकांच्या बँकखात्यात जमा करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील 9 लाख 37 हजार 517 शिधापत्रिकाधारकांपैकी 4 लाख 94 हजार 602 ग्राहकांनी रॉकेल अनुदानासाठी विविध राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाती उघडली आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सोपान कासार यांनी दिली.

कासार म्हणाले, केरोसिनचे अनुदान थेट शिधापत्रिकाधारकांच्या बँकखात्यांत जमा करण्यासाठी 15 जून ते 12 ऑक्टोबर या कालावधीत दर शनिवारी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. बँकेत खाते उघडण्यासाठी ठरवून दिलेल्या तारखेस बँकेचे अधिकारी, तलाठी व स्वस्त धान्य दुकानदारांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. ज्या शिधापत्रिकाधारकांचे संयुक्त खाते उघडण्यात आले आहे, त्या खातेदारांच्या नावे स्वस्त धान्य दुकानदारांच्या रजिस्टरमध्ये नोंद करावी, तसेच ज्या शिधापत्रिकाधारकांचे खाते अद्याप उघडलेले नाही, अशा शिधापत्रिकाधारकांनी संबंधित बँकेतून नवीन खाते उघडण्यासाठी फॉर्म आणून भरावे. 161 गावांमध्ये 10 हजार 226 शिधापत्रिकाधारकांचे नवीन खाते उघडलेले आहे.